Friday, 23 November 2012

नैतिकतेची ऐशीतैशी



. पत्रकारितेतील हिणकस दूर करण्याची इच्छा होणे त्यासाठी अनेकजण एकत्र येणे आणि त्यासाठी करायचा कृती कार्यक्रम आखणे आशादायक म्हणाव्या लागतील .पत्रकारांचा पत्रकारांच्या नितीमुल्ल्यांचा विचार केला तर अनेक गोष्टी समाविष्ट असतात .नैतिकता ही सांगुन शिकवली जात नाही तर ती अनुभावाने ती आत्मसात करावी लागते .माध्यमांच्या बाबतीत तर ही नैतिकता वेशीवर टांगलेली नैतिकतेचा  प्रश्न आला कि अनेकांना प्रश्न पडतो कि समाजात नैतिकता पाळणारे किती जण  आज समाजात वावरत आहेत आणि किती लोकांना नैतिकतेचा खरा अर्थ माहीत आहे याचा विचार व्हायला हवा कारण समाजात नैतिकतेचे अक्षरश धिंडवडे काढले जात आहेत मात्र   समाजाची जी धुरा सांभाळणारे समाजातील लोकचं समाजाच्या वाईटावर उठले आहेत  यात काडीमात्र शंका नाही . पत्रकारितेमध्ये पत्रकाराने काय करणे बरोबर आणि काय करणे चुक ते ठरविण्यास मदत करणारी तत्वप्रणाली म्हणजे पत्रकारांच्या नीतीमूल्यांची संहिता आसे प्रा जॉन मेरिल यांचे म्हणणे आहे .पत्रकारांना नितीमुल्ये कोणी शिकवायची समाजातील छोटया चुकीची बातमी देणारेच चुकले तर त्यांच्या बातम्या कोणी छापायच्या आणि त्यांचावर वचक कोणी ठेवायचा असा प्रश्न आत्मपरीक्षण करण्याची सवय असलेल्या आणि त्यामुळे अस्वथ होणाऱ्या विविध कालखंडातील बऱ्याच पत्रकारांना पडत आला आहे असते .आज समाज जसा बदलत चालला आहे तसा समाजात वाईट प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणावर आहेत आज रुपर्ट मरडॉक सारखा माध्यमाचा जगजेत्ता केवळ साम्राज्य वाढीसाठी अनेक समाजविघातक कामे करताना दिसतो .म्हणजे फोन रेकॉर्ड करणे एखादी माहिती मिळवण्यासाठी पैसे देऊ करणे हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे . .आज लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून माध्यमांना ओळखले जाते मात्र हाच आधार स्तंभ आता ढासळत चालला आहे .टीआरपी वाढवण्याच्या नावाखाली अशा थिल्लर गोष्टींना नको एवढे महत्त्व माध्यमांमधून दिले जाते. पण टीआरपीचे गणित पाहिले तर ते खोदा पहाड निकला चूहाअसे म्हणावे लागेल.मात्र माध्यमाचा असा उतावीळ पणा आज नैतिकतेचे बुरुज ढासळत आहे .आज माध्यमांच्या विश्वासहर्यातेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे .त्यासाठी माध्यमांनी विचारपूर्वक वागणे क्रमप्राप्त जाले झाले आहे   माध्यमांच्या या अश्या बेताल वागण्याने समाज ही भरकटत चालला आहे माध्यमे ही समाज मनाचा आरसा आहेत आणि त्या मधुन व्यक्त होणारे संदेश हे समाजास घातक तर नाहीत ना हे माध्यमांनी पाहणे गरजेचे आहे मात्र आज तस न होता माध्यमे समाजात वाट्टेल ते दाखवतात मात्र समाजावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो .पत्रकारितेतल्या पित्त्यांनी आपली नैतिकता पारच बासनात गुंडाळली आहेवाहिन्यांच्या जाहिरातींचे बजेट, तिथे काम करणाºयांचे प्रमोशन्स अशा अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग टीआरपी वाढवण्यासाठी (?) वाट्टेल त्या थराला जात, सतत ब्रेकिंग न्यूजचा मारा करत त्यांचे काम चालते. आणि त्यामुळेच माध्यमे ही विश्वासाच्या लायकीची नाहीत मात्र एखाद्या वैक्तीने नैतिकता पाळली नाही आणि म्हणुन आम्ही तरी का पाळावी असा सूर माध्यमामध्ये डर्टी पिक्चर या चित्रपटाच्या वेळी पाहायला मिळाला मात्र विविध माध्यमांच्या या युगात माध्यमे हि नैतिकता हीन झालेली आपल्याला दिसतात .म्हणजे इंटरनेट मध्ये इमेल हैक करणे वर्तमानपत्रात पैसे देऊन बातम्या मिळवणे दूरचित्रवाणी मध्ये खोटी आणि काहीही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणे  ही सगळी नैतिकतेच्या विरुद्ध  जाणारी  उदाहरणे आहेत . समाज हा नैतिकतेच्या अगदी विरुद्ध दिशेने चालला आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे आज माध्यमाचे राजरोस पणे वागणे मात्र यात लोकांचा ही तितकाच गुन्हा आहे.जर समाजातील वाईट प्रवृत्ती ला बाहेर काढून नैतिकतेला नैतिकतेला धरून जर वागलो वागलो तर समाजातील अनेक समस्या दूर होतील होतील आणि सर्वसामान्य लोक ही माध्यमांवर विश्वास ठेऊ लागतील मात्र यासाठी माध्यमांनी आणि जनतेने ही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे आणि समाजातील प्रथा रूढी यांना दूर सारून समाज प्रगतीशील बनवणे गरजेचं आहे

No comments:

Post a Comment