Friday, 23 November 2012
नैतिकतेची ऐशीतैशी
पीत पत्रकारितेचा पिवळेपणा .....

शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता
करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार
माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे
ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना
भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या
महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि
सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी
बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे
सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये.
समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट
परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे
हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा
नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .
पेड न्यूज हा लोकशाहीच्या चौथ्या स्तभाला लागलेला सगळ्यात
मोठा कलंक आहे .आजच्या आजच्या या या पत्रकारितेमध्ये खरच विचार करण्याची
वेळ आली आहे कारण मुळातच पत्रकार हा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि
या मुळे पत्रकारितेतील स्वायतत्ता वस्तुनिष्ठता सामाजिक बांधिलकी
सत्याची कास पूर्वग्रह रहित वृत्ती ईत्यदि मुल्ये ही पत्रकारांनीच जपायची असतात
आणि तीच आज जपण्यात कुठे तरी पत्रकार अयशस्वी झाले आहेत .पत्रकारिता
करण्यासाठी माध्यम हवे असते आणि माध्यम म्हटले की त्या अनुषंगाने त्या त्या
माध्यमांचे अर्थकारण आणि समाजकारण आले यातूनच पीत पत्रकारिता उदयास आली.आणि या मुळेच
समाजात पत्रकारीतेवरचा विश्वास उडत चालला आहे भारतामध्ये अगदी
अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमामधील भ्रष्टाचाराची चर्चा २००९ च्या लोकसभा
निवडणुकीत पेड न्यूज च्या संदर्भात झाली .एखादी जाहिरात
वाचक अथवा प्रेक्षकांना न सांगता बातमीच्या स्वरुपात मांडणे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून
आहे का विशेषतः जाहिरात जर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आणि त्या
प्रक्रियेतून निवडून येणाऱ्यांसाठी असेल तर लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे
धिंडवडे काढल्यासारखेच नाही का असे अनेक प्रश्न या वेळेस विचारले गेले .या वेळेस ही
माध्यम संस्था चे मालक पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील हितसंबध चांगले कळले . रुपर्ट मर्डोक हा ऑस्ट्रेलियन
वंशाचा अमेरिकी माध्यमसम्राट! छापील आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा अब्जावधी डॉलरचा
धंदा हा मर्डोक खाजगी कंपन्यांद्वारे जगभर चालवत असतो. इंग्लंडमध्ये तर ‘टेबलॉयड’ या वृत्तपत्रीय प्रकारांत
मर्यादा सोडून सनसनाटी पत्रकारिता चालवली जाते. तेथे लाखो प्रतींचा खप असलेल्या ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’
या मर्डोक यांच्या
मालकीच्या टेबलॉयडने वृत्तपत्र व्यवसाय व सामाजिक बांधीलकीचे सारे विधिनिषेध धाब्यावर
बसवून मागील काही वर्षे पत्रकारिता (म्हणजे पीत पत्रकारिता) चालवली होती हे उघड झाले.
राजकारणी तसेच इतर महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींचे मोबाइल हॅक करून
(म्हणजे त्यांची खाजगी संभाषणे चोरून) एकामागोमाग एक लफडी व खाजगी प्रकरणे या टेबलॉयडने
उघड्यावर आणली.
आणि त्या मुळेच पीत पत्रकारिता अधिक प्रकाश झोतात आली आणि सरकारने आणि संपूर्ण
जगणे ही त्या बाबतीत पाऊले उचलायला सुरुवात झाली मात्र ती तेवढया पुरतीच कारण त्या
बाबतीत कडक कायदे अजून ही आमलात आणले नाहीत त्या मुळेच की काय समाजात
अजुन पेड न्यूज चे पेड अजुन ही अस्तित्वात आहे. आपल्या देशातील पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता
ही गांधी युगांतील पत्रकारिता ध्येयवादी होती. त्या वेळी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने
भारलेले राष्ट्रीय नेते - गांधी,
टिळक, आगरकर वगैरे - पत्रकारिता
क्षेत्रांत वावरले ते स्वातंत्र्यासाठी, समाजमन घडवण्यासाठी, तयार करण्यासाठी. त्यांना
समाजापर्यंत जाण्याचे ते एक माध्यम होते.
शोध पत्रकारिता या गोंडस बुरख्याआड दडून प्रत्यक्षात पीत पत्रकारिता
करू पाहणाऱ्यांचा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आहे. पेड न्यूज हा प्रसार
माध्यमातील भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे आणि हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकणे
ही काळाची गरज बनली आहे .आणि यासाठी समाजाने ही यासाठी सजगता दाखवणे गरजेचे आहे. भारतात महिलांना
भर बाजारात विकले जाते, ही गोष्ट अश्विन सरीन या पत्रकाराने स्वत:च कमला नावाच्या
महिलेची 'खरेदी' करून सिद्ध केली. अशा धैर्यशील पत्रकारांमुळे समाजव्यवस्था सुधारण्यास आणि
सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण होण्यास मदत झाली. पण केवळ सनसनाटी
बातमीच्या हव्यासापोटी कुणी दुसऱ्याच्या खाजगी जीवनात शिरून नाहक बदनामी करण्याचे
सत्र आरंभले, तर 'पत्रकार' म्हणून त्यांस संरक्षण मिळता कामा नये.
समाजात पीत पत्रकारितेचे वादळ आज हि आहे आणि त्या माध्यमाचा समाजावर वाईट
परिणाम होताना दिसत आहे मात्र याचा नाश होणे गरजेचे आहे . समाज हा होत असलेली पत्रकारिता ही पाहणे
हेच समाजाचे काम आहे मात्र त्यातील जे काही गैरव्यवहार ते थांबवण्यास समाज हा
नक्कीच मदत करू शकतो .मात्र यासाठी सर्व समाजाचे सहकार्य गरजेचे आहे .
Saturday, 20 October 2012
कॅमेरा -प्रभावी माध्यम
माध्यम क्रांती
एखादी
गोष्ट जेव्हा कथेतून सांगितली जाते तेव्हा त्यात आपल्या कल्पनेचा चा विस्तार होत असतो आणि आपण ती गोष्ट
विचारातून मांडत आसतो मात्र तीच गोष्ट जेव्हा माध्यमातून सांगितली जाते तेव्हा
त्यात अनेक बाजू असतात .आणि त्या मुळे ती कथा दाखवता
त्यात विविध चित्र किवा लेखन दिलेले असते कि जेणेकरून ती कथा अधिक चांगल्या
प्रकारे लोक्काना समजते याचे उदाहरण म्हणजे आपण एखादी बातमी वर्तमान पत्रात वाचतो
त्याचे जेवढा परिमाण आपल्यार होतो त्या पेक्षा किती तरी जास्त परिणाम आपण तीच
बातमी दूरदर्शन
वर पाहिल्यावर होतो आणि त्या मुळे त्याचा परिणाम हा वर्तमान पत्राचा मानाने कितीतरी
जास्त आसतो

उदाहरणार्थ
एखादी घटना घडली तर त्या ठिकाणचे छाचित्र काढले जाते तो एक पुरावा म्हणून वापरला
जाऊ शकतो
डेव्हिड बोर्डवेल यांचे मत आहे. कॅमेरा आपल्याला
कथेबाबत असे काही सुगावे देतो जे मुख्य गोष्टीमधे खूप नंतर येतात हे बरोबर आहे कारण
काही वेळा त्यात तथ्य आहे कॅमेरा हे आशी गोष्ट कॅपचर करतो कि ज्या मुळे अनेक सुराग
मिळत जातात .

भाषा म्हणजे विचार
भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच
सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या
वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" प्रतीक असतो. ही वस्तुस्थिती
काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना
नसते. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या
माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत
बदल घडताहेत

विशिष्ठ
नियमांना धरूनच भाषा नेहमी काम करत असते म्हणून भाषेला भावनांची संस्कृतीची
मर्यादा पडते आणि त्या नुसार ती बोलत असते. वाक्य आणि भाषा यांना जरी नियाम्मांचा
कचाट्यात रहाव लागल तरी त्यांचे एक वेगळे विश्व हि आहे
भाषा आणि वाक्य हे घटनांचे प्रकटीकरण करत असते आणि समाजाचा आरसा बनत असते त्या मुलेच ते त्यांचा विश्व पासून जोडलेले असते जनमाध्यमे म्हणजे दूरदर्शन वर्तमानपत्र या सारक्या माध्यमांना भाषे ची गरज असते आणि त्यांचा मार्फत ते माहिती लोकांना पोहचवतात
भाषा आणि वाक्य हे घटनांचे प्रकटीकरण करत असते आणि समाजाचा आरसा बनत असते त्या मुलेच ते त्यांचा विश्व पासून जोडलेले असते जनमाध्यमे म्हणजे दूरदर्शन वर्तमानपत्र या सारक्या माध्यमांना भाषे ची गरज असते आणि त्यांचा मार्फत ते माहिती लोकांना पोहचवतात
लुड्विग विट्जेंस्टाइन यांच्या म्हणण्या नुसार ते बरोबर आहे कारण प्रत्येक भाषा स्वत ची एक नियमावली बनवते.
जनमाध्यमे

शब्दगावी
शब्द हे संवादाचे एक महत्व चे आणि मुलभूत साधन आहे कि ज्या मुळे
संवाद
हा दुहेरी होतो आणि संवाद प्रक्रियेला चालना हि मिळते मात्र संवाद घडत आसताना
त्या काही आशा घटकांचा हि समावेश आसतो कि ज्या मुळे संवाद अधिक प्रभावी होतो.यासठी
उत्तम माध्यमांची
आणि साधनांची गरज पडते .

माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा
संस्कृती म्हणजे नेमके काय?
एक पिढी जगण्याचे काही
नियम ठरवून घेते, जेणे करून जीवन सोपे आणि सुलभ होइल. अशा काही गोष्टी अंगिकारते
की ज्यामुळे समाजाचे एकमेकाबद्दलचे वर्तन, परस्परसंबंध सलोख्याचे राहतील. समाजाच्या
हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते की जेणेकरुन सौहार्द नांदेल. एकमेकाबद्दलचे प्रेम
वाढीला लागेल. समाजातील वाईट किंवा अनिष्ट गोष्टींना आळा घालता येइल. मग त्यानुसार
सगळी पिढी जगायला लागते, जगते, वाढते. ही जी एकंदर प्रक्रिया असते त्यातुन तुमची आमची संस्कृती
निर्माण होत असते. आपले पुर्वज जसे वागले तसे आज आपण वागतो आणि त्यालाच आपली संस्कृती
म्हणतो. संस्कृती माणसाला शिकवते सुसंस्कृतपणा.पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली
मोट म्हणजे संस्कृती.
गटेनबर्गच्या छपाई
यंत्रापासून माणसाच्या संज्ञापन व्यवहारत यांत्रा चावापर सुरु झाला व त्यानंतरच संज्ञापन
प्रक्रियेलावे वेग आला.
संस्कृती हि काळानुसार
बदलत जाते आणि त्या मुळेच ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधने हि बदलत जातात संस्कृती
हि संवादाला एक नवीन दिशा देण्यास मदत करते आणि समाजामध्ये हि नवीन विचारांना रूजण्यास हि मदत होते.वर्तमानपत्रे/दूरचित्रवाणी/रेडिओ/इंटरनेट तयार करताना हि संकल्पना महत्वाची ठरते कारण संस्कृती हि प्रत्येक माणसाला
जोडलेली असते आणि ती संज्ञापानाचा एक अविभाज्य भाग आसते.
माध्यमांचा सहभाग

आपली संस्कृती टिकायला हवी असेल तर हा नव्या-जुन्यांचा तोल आपल्याला
सावरायलाच हवा.
माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा यांचा संबंधच संस्कृती आणि माध्यमे यांना लोकांपर्यंत प्रभावी पाने पोहचवू शकते .
Subscribe to:
Posts (Atom)