संस्कृती म्हणजे नेमके काय?
एक पिढी जगण्याचे काही
नियम ठरवून घेते, जेणे करून जीवन सोपे आणि सुलभ होइल. अशा काही गोष्टी अंगिकारते
की ज्यामुळे समाजाचे एकमेकाबद्दलचे वर्तन, परस्परसंबंध सलोख्याचे राहतील. समाजाच्या
हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते की जेणेकरुन सौहार्द नांदेल. एकमेकाबद्दलचे प्रेम
वाढीला लागेल. समाजातील वाईट किंवा अनिष्ट गोष्टींना आळा घालता येइल. मग त्यानुसार
सगळी पिढी जगायला लागते, जगते, वाढते. ही जी एकंदर प्रक्रिया असते त्यातुन तुमची आमची संस्कृती
निर्माण होत असते. आपले पुर्वज जसे वागले तसे आज आपण वागतो आणि त्यालाच आपली संस्कृती
म्हणतो. संस्कृती माणसाला शिकवते सुसंस्कृतपणा.पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली
मोट म्हणजे संस्कृती.
गटेनबर्गच्या छपाई
यंत्रापासून माणसाच्या संज्ञापन व्यवहारत यांत्रा चावापर सुरु झाला व त्यानंतरच संज्ञापन
प्रक्रियेलावे वेग आला.
संस्कृती हि काळानुसार
बदलत जाते आणि त्या मुळेच ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधने हि बदलत जातात संस्कृती
हि संवादाला एक नवीन दिशा देण्यास मदत करते आणि समाजामध्ये हि नवीन विचारांना रूजण्यास हि मदत होते.वर्तमानपत्रे/दूरचित्रवाणी/रेडिओ/इंटरनेट तयार करताना हि संकल्पना महत्वाची ठरते कारण संस्कृती हि प्रत्येक माणसाला
जोडलेली असते आणि ती संज्ञापानाचा एक अविभाज्य भाग आसते.
माध्यमांचा सहभाग

आपली संस्कृती टिकायला हवी असेल तर हा नव्या-जुन्यांचा तोल आपल्याला
सावरायलाच हवा.
माध्यमाची विश्वासार्याहता आणि संस्कृतीचा वारसा यांचा संबंधच संस्कृती आणि माध्यमे यांना लोकांपर्यंत प्रभावी पाने पोहचवू शकते .
No comments:
Post a Comment