Saturday, 20 October 2012

भाषा म्हणजे विचार








भाषा
भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.  भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" प्रतीक असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त  वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत
      भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात
विशिष्ठ नियमांना धरूनच भाषा नेहमी काम करत  असते म्हणून भाषेला भावनांची संस्कृतीची मर्यादा पडते आणि त्या नुसार ती बोलत असते. वाक्य आणि भाषा यांना जरी नियाम्मांचा कचाट्यात रहाव लागल तरी त्यांचे एक वेगळे विश्व हि आहे
भाषा आणि वाक्य हे घटनांचे प्रकटीकरण करत असते आणि समाजाचा  आरसा बनत असते त्या मुलेच ते त्यांचा विश्व पासून जोडलेले असते जनमाध्यमे  म्हणजे दूरदर्शन वर्तमानपत्र या सारक्या माध्यमांना भाषे ची गरज असते आणि त्यांचा मार्फत ते माहिती लोकांना पोहचवतात

लुड्विग विट्जेंस्टाइन यांच्या म्हणण्या नुसार ते बरोबर आहे कारण प्रत्येक भाषा स्वत ची एक नियमावली बनवते. 
जनमाध्यमे

           जनमाध्यमे  हि समाजाला  एक नवीन विचार करायला भाग पडते कि ज्या मुले भाषा हि आणखी प्रघाल्भा बनते प्रत्येक भाषेची स्वताची आशी नियमावली असते कि ज्या मुले ते त्यांचा एक कोश तयार करतात आणि त्या नुसार लोकांना माहिती पुरवतात मात्र प्रत्येक भाषेची वैशिट्ये  बलस्थाने  मर्यादा ह्या भाषे नुसार वेगवेगळ्या असतात  गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही. म्हणून भाषा हि नेहमी नियमामध्ये राहूनच मध्याम्माना  घेऊन बोलत असते.

No comments:

Post a Comment