Friday, 19 October 2012

चित्रांची भाषा ही सर्वदूर समजली जाणारी भाषा


चित्र ची भाषा आशी भाषा कि ज्यात काही बोलण्या ची गरज पडत नाही म्हणून आज चित्रातून  अनेक बाबतीत ला उलगडा केला जातो .



   जन संवादाबाबतच्या सर्व आविष्कारांमधे चित्रांची भाषा ही सर्वदूर समजली जाणारी भाषा आहे.
हे  वॉल्ट डिस्ने यांचे वाक्य आहे.
जनसंवाद हा आज केवळ बोलण्यातून व्यक्त होत नाही तर चित्रांचा माध्यामातून हि तो केला जातो .एखादी घटना जर जास्तीत जास्त लोक्काना जर नीट समजावून सांगायचे असेल तर चित्र हे योग्य माध्यम आहे.मध्यम विश्वात घडण्यर्या ज्या घटना असतात त्यांचा संबंध  हा समाजाशी  असतो त्या मुलेच मग हा परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्या साठी आसे विविध पर्याय योजावे लागतात.  
      चित्राची भाषा कळायला कठीण नाही, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात ना तर ते खूप सोपं आहे. त्याकरता सारखी चित्रं बघायला हवीत, चित्रकारांशी बोलायला पाहीजे. चित्रातली प्रतिकात्मकता वगैरेही जाणून घ्यायची फ़ार गरज नसते,  नवी व्हिज्युअल भाषा अस्तित्वात येऊ घातली आहे. ती परस्परसंवाद कसा व कोणत्या माध्यमातून सादर करणार याचा कोणालाच अंदाज करता येत नाही एवढा गुंता वाढला आहे. चित्रपटाची भाषा, चित्रांची भाषा येऊ घातल्यामुळे शब्दाक्षरांची भाषा तेवढी प्रभावी राहिलेली नाही. परिणामत: शब्दाक्षरांची भाषा आपला डौल गमावून बसली आहे. शब्दाक्षरांच्या भाषेचा वापर सध्या फक्त कार्योपयोगी होत आहे. वाङ्मयनिर्मितीतील अभिजातता लोपते की काय, अशी शंका आधीच येऊ लागली आहे. चित्राचा आशय काय आहे, ते कशाचे चित्र आहे, ते ज्या  प्रकारच्या वस्तूचे किंवा प्रसंगाचे आहे, त्याचे जीवनात किती महत्व आहे, त्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या, त्या चित्राने घडविलेल्या दर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात कोणत्या करूणा, शोक, आनंद इ. भावना जागृत होतात ह्या गोष्टीवर चित्राचे सौंदर्य यत्किंचितही अवलंबून नसते, तर चित्राचे चित्र म्हणून जे रंग, रेषा, पृष्ठभाग इ. भाग असतात. त्यांच्या परस्परसंबंधांमधून सिद्ध होणाऱ्या त्याच्या आकारावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते..

               म्हणूनच चित्राची भाषा हि अधिक सोयीची ठरते आणि समजण्यास हि सोपी आहे हि भाषा साक्षर ते निरक्षर  लीकांना हि अधिक सहज पणे कळते आणि चित्रे हि शब्दांपेक्षा  अधिक बोलकी आसतात  यावरून ती अधिक परिणाम कारक ठरतात.  


No comments:

Post a Comment