Friday, 19 October 2012

भाषांतर किंवा अनुवाद.





एका भाषेतला मजकूर नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद.

एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करण्यासाठी नेमकं काय काय लागतं असा विचार केला तेव्हा नजरेसमोर या तीन गोष्टी येतात 
 १. माहिती (सांस्कृतिक संदर्भ इ.)
 २. साधने (कोश इ.)
 ३. कौशल्ये (अनावश्यक अर्थ अनुवादात आणणे कसे टाळायचे इ.)
अनुवाद करण्यासाठी लागणारी किमान माहिती/ज्ञान-
 १. स्रोतभाषेच्या (ज्या भाषेतून अनुवाद करायचा ती भाषा) केवळ आकलनापुरते ज्ञान: म्हणजेच, इंग्रजीतील एखाद्या कथेचा अनुवाद करायचा असेल, तर इंग्रजीतील शब्द, त्यांचे अर्थ, ते शब्द एखाद्या प्रकारे मांडल्यावर कोणता अर्थ समोर येतो इ. इ. गोष्टींचे ज्ञान  हवे .
 २. लक्ष्यभाषेत (ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा) निर्मिती करण्यासाठी आवश्यक ज्ञान: म्हणजेच, जर मराठी भाषेत अनुवाद करायचा असेल, तर विशिष्ट अर्थ दर्शवणारे मराठीतले शब्द, आपल्याला हवा तो अर्थ अभिव्यक्त करण्यासाठी शब्दांची कशी मांडणी करावी लागेल इ. इ. गोष्टीचे ज्ञान  हवे .

थोडक्यात काय, तर स्रोतभाषा समजणे महत्त्वाचे, वापरता येणे नव्हे. याउलट, लक्ष्यभाषा वापरता येणे मात्र फारच महत्त्वाचे. एवढे आले, म्हणजे अनुवाद करता येतो

अनुवाद करताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते आणि त्या मूळेच अनुवादाची प्रक्रिया काहीशी कठीण असते.मात्र अनुवादात स्त्रोत लक्ष्य भाषा त्यांची वैशिस्ठे बलस्थाने आणि मर्यादा तसेच त्यांचा तील परस्पर संबंध हि यात महत्वाचा असतो.

अनुवाद करताना खालील गोष्टी काही प्रमाणात लोप पावतात -
१. आशय बदलतो
२. विषयाचा रोख बदलतो
३. लोकांना जो संदेश पाहोचावायाचा आहे तो कधी कधी वेगळाच पोहोचतो
४.साहित्य कृतीतील ज्या संसृतीचा प्रभाव आहे त्याचा नकारात्मक प्रभाव हि पडू शकतो अ
५.अनुवाद करताना कधी कधी चुकीचा अनुवाद झाला तर संपूर्ण लेखाचा अर्थ हि बदलू शकतो
म्हणून अनुवाद करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात -
१.अनुवाद करताना आशय घनता लक्षात घ्यावी 
२.लेखाचा हेतू लक्षात घ्यावा
३.अनुवाद करणाऱ्या वैक्तीला अनुवाद चे उत्तम ज्ञान असावे.
४.लेखाची  सामाजिक पर्शभूमी  लक्षात  घावी .
कोणत्या हि लेखाचा निबंधाचा  किवा बातमी चा अनुवाद करताना विविध  सांस्कृति चे भान असणे आवशक आहे  सांस्कृतिमधील सण चालीरीती याची माहिती असावी

No comments:

Post a Comment