Saturday, 13 October 2012

अंधश्रध्दांचं मूळ





              रस्त्यावर शेकडो लोकांची गर्दी. दारू पिऊन तर्र झालेले अंगाला पिवळा रंग लावलेले हातातला आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे,रस्त्यावर धुड्गुस घालणारे पोतराज. काही दारू पिऊन अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिंबाच्या फाट्याने स्वतःला मारून घेत होत्या.. केस मोकळे, कपाळ्भर कुंकू. मध्येच कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून, मुलाला पायावर ठेवून जाताना दिसत होत्या. नारळ, फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग. मुख्य म्हणजे गर्दी होती ती सुशिक्षित लोकांची. अमूक-अमूक सांगतो,म्हणून ते खरंच असलं पाहिजे.तो महान माणूस म्हणतो तो शब्दंच प्रमाण,वेगळ्या प्रमाणाची आवश्कताच नाही.चिकित्सा करण्याची गरज नाही शब्दप्रांमाण्य आणि अचिकित्सा हे अंधश्रध्दा प्रक्रीयेचे दोन प्रधान घटक आहेत.


अंधश्रध्दा म्हणजे काय?

जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठवणे,ती मानणे म्हणजे अंधश्रध्दा ,अंधश्रध्दा केवळ अञान नाही तर ती प्रक्रिया आहे.म्हणूनच देवा-ध्रर्माशी तिचं नातं एवढं सरळ आणि सोपं नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देव व धर्म नाकाणारा बुध्द धर्म स्वीकारला त्यांच्या चळवळीतील बहुसंख्य समाज गेल्या ४० वर्षाच्या प्रयत्नांना खरंच देव मानत नाहीत.बहूसंख्यांक(हिंदु) धर्मही मानत नाहीत. म्हणून त्यांच्यातल्या अंधश्रध्दा दूर झाल्यात का? दीक्षाभूमीवर जाणा-या जनतेपैकी किमान एक-चतुर्थांश लोक तरी विक्तुबाबासारख्या एका पागल माणसाच्या देवस्थानाला वा गजानन महाराजांच्या शेगावला मोठया भक्तीभावाने भेटी देतात,भूत-प्रेत मानतात,म्हणजे देव सुटला तरी बाकीच्या अंधश्र्ध्दा बहुसंख्यं लोकांना तशाच गोचिडीसारख्या चिटकवून राहिल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.म्हणूनच देव व धर्म नाकारणारेही अंधश्रध्दा असू शकतात.त्याचं कारण एवढंच आहे की अंधश्रध्दा असू शकतात.त्याचं कारण एवढंच आहे की अंधश्रध्दांचं मूळ देव व धर्म या कल्पनेतं नाही,तर अंधश्रध्दाच्या प्रक्रियेत आहे. ज्याला आपण श्रध्देची वा शब्दप्रामाण्याची प्रक्रीया म्हणतो ती ही प्रक्रिया
             समाजात शिक्षणाचा प्रसार झपाटय़ाने होऊन जग विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरून एकविसाव्या शतकाकडे झेपावले असले तरी अंधश्रध्दा, अनिष्ठ चाली-रितीरिवाज, कुप्रथा चालूच आहेत. अंधश्रद्धा  '  हा मानवी जीवनाला मिळालेला फार मोठा शाप आहे. हा शाप म्हणजे मूतिर्मंत विषारी साप आहे. साप माणसाला एकदाच चावेल आणि मारेल  ;  पण अंधश्रद्धेचा शाप मात्र मानवी जीवन युगानुयुगे विषमय करून माणसाला दु:खाने भाजून काढीत आहे. अज्ञान  ,  दारिद्य  ,  भयगंड आणि लोभ या चार गोष्टी अंधश्रद्धेला सतत खतपाणी घालीत असतात. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर दारिद्य  ,  भयगंड व लोभ या तिघांनाही मूळ कारण  ,  अज्ञान हेच असत अंधश्रद्धेचे भूत हे अशिक्षित माणसाच्या मानगुटीवर जसे बसले आहे  ,  तसे सुशिक्षित लोकांच्या मानगुटीवरसुद्धा बसलेले आहे. वरच्या स्तरातील म्हणजे शिक्षक  ,  प्राध्यापक  ,  डॉक्टर  ,  सरकारी अधिकारी  ,  खासदार  ,  मंत्री अशीही मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली दिसून येतात. या लोकांचा करणी  ,  मूठ मारणे  ,  भूतबाधा  ,  अंगात येण्याचे प्रकार  ,  ज्योतिष व तथाकथित चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास असतो. इतकेच नव्हे  ,  तर हे लोक बाबा  ,  बुवा  ,  भगत यांच्या दारात मोटारींच्या रांगा लावतात. यांना पाहिल्यावर समाजातील अशिक्षित व अडाणी लोकांनी त्यांचे अनुकरण केले नाही तर नवलच. तात्पर्य  ,  शाळा-कॉलेजांतून मिळणारे शिक्षण अंधश्रद्धेशी मुकाबला करण्यास समर्थ ठरत नाही. या अज्ञानाच्या जोडीला जर दारिद्य व लोभ असेल  ,  तर अंधश्रद्धेचा राक्षस माजल्याशिवाय रहात नाही. दारिद्य दूर होऊन श्रीमंत व्हावे यासाठी समाजातील अज्ञानी लोक श्रीमंत होण्याचे व त्वरित फळ देणारे मार्ग शोधीत रहातात. उदी  ,  भस्म  ,  अंगारे  ,  धुपारे  ,  गंडे-दोरे वगैरे प्रकार व नरबळी  ,  पशुबळी अशा निंद्य पद्धती समाजात रूढ होऊन बसलेल्या आहेत. याचे कारण झटपट फळ मिळण्याची आशा हे होय . थोडक्यात मानवी जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी  '  शहाणपण  '  ही एकच गोष्ट आवश्यक आहे  ,  याची जाणीव मानव जातीला होणे आवश्यक आहे.
          गेल्या काही वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज ना उद्या हा कायदा होईलही. परंतु केवळ कायदा पुरेसा ठरणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कारण विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्मकांड, जारणमारण, जादूटोणा, मंत्रतंत्र, व्रतवैकल्ये यांना भक्कम धार्मिक आधार आहे. जोपर्यंत धार्मिक-कर्मपिवाकवादी धर्मश्रद्धा पाझरत राहतील, जोपर्यंत जीवनाचा पाया संदिग्ध व भोंगळ राहील, जोपर्यंत जनतेच्या मनात अशा धार्मिक पायाविषयी ममत्वभाव अस्तित्वात असेल आणि जोपर्यंत हा पायाच त्यांचा अधिकृत धर्म असेल, तोपर्यंत 'न आवडणाऱ्या कळसावर' कितीही तलवारी चालविल्या तरी अपेक्षित यश मिळणार नाही!

No comments:

Post a Comment