सनस्टाईन व वेरम्यूल या 'हार्वर्ड लॉ स्कूल' मधल्या प्राध्यापकांनी 'Is capital punishment morally required?' या नावाचा एक लेख २००५ साली प्रसिद्ध केला.
मृत्युदंड विरोध
निव्वळ हास्यास्पद आहे, शिक्षा हि यासाठी नसते कि जे वाईट कृत्य केले त्याची शिक्षा
तर त्याचा दुसरा पैलू हा सुद्धा असतो कि इतर माणसाना दहशत बसावी कि हे कृत्य केले तर
आपला सुद्धा मृत्यू निश्चित आहे.जर कोणाला भीतीच उरणार नाही तर प्रत्येक जण खून करत
सुटणार आणि आपण काय त्यांना सुधारत बसायचे आणि वाट पहायची कि हा कधीतरी नक्की सुधारेल. कायदेशीर मारण्याच्या पद्धती
फासाला लटकावणं, विजेचा शॉक, विषारी इंजेक्शन,फायरिंग स्क्वाड, डोकं उडवणं,
गॅस चेंबर. या आहेत.
1.
फाशी दिल्याने प्रश्न सुटतात असे वाटते का ?
2.
प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी नको का?
3.
त्याने केलेले कृत्य हे कोणत्या परिस्थितीमध्ये केले आहे हे पाहायला
नको का?
. या सर्व गोष्टी पाहुनच
फाशीची शिक्षा सुनावली जाते.हा निसर्ग नियमच आहे (एकाच्या मृत्यूची शिक्षा शी मृत्युचं
असू शकते).
अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात.-ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली
आहे.
Ø
सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश
: ब्याण्णव.
Ø
फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा..
Ø
फाशी देण्याची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षात वापरली नाही असे देश:
बत्तीस
Ø
फाशी चालू आहे आणि रेग्युलर देतातही असे देश: चौसष्ठ.
फाशी विरोधकांचे मुद्दे:
v
क्रूर आणि अमानवी..कायदेशीर खून. म्हणून तो नकोच.
v
चुकीचा निर्णय होण्याची शक्यता.
v
जगण्याचा मूलभूत अधिकार गुन्हेगारालाही आहेच. मग फाशी कशाला?
v
जन्मठेपही पुरेशी वचक बसवणारी असते मग फाशी कशाला.. ?
v
फाशीने गुन्ह्यांची संख्या कमी होत नाहीये. म्हणून ती इफेक्टीव्ह नाहीये.
-फाशीच्या बाजूनं असणा-यांचे मुद्दे:
v
सेन्स ऑफ जस्टीस. न्यायाचं समाधान. खून के बदले खून. आय फॉर आय. जिवासाठी
जीव..
v
जन्मठेपेपेक्षा कमी खर्चिक.
v
गुन्हेगाराला जिवंत ठेवलं तर नंतर सुटण्याची, पळून जाण्याची संधी
राहते. फाशीने ही संधी मिळत नाही.
v
जन्मठेप ही जास्त त्रासदायक आहे. त्यापेक्षा फाशीने सुटका मिळते.
माझे मत थोडक्यात सांगायचे तर फाशीची तरतुद असावी.. मात्र ती
फारशी वापरली जाऊ नये. हे "फाशी" प्रकरणच धोकादायक आहे.. फाशी म्हणजे नक्की
किती तर माझ्या मते वैयक्तीक गुन्हांसाठी ही शिक्षा नसावी. जसे एका व्यक्तीने एका व्यक्तीवर
केलेला बलात्कार,
एका व्यक्तीने एका व्यक्तीचा काही कारणाने केलेला खून वगैरे
वगैरे. सामुहिक,
राष्ट्रद्रोही,
देशावर हल्ला वगैरे गुन्हात या शिक्षेची तरतुद
तर असावीच प्रसंगी शिक्षाही व्हावी