Tuesday, 15 October 2013

मल्टी मिडिया



सोशल मिडिया आज प्रत्येक नेट स्यावी च्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे . इंटरनेट वापरणारे आज ९९ टक्के लोक आज सोशल मीडियाशी कनेक्टेड असून एकाच वेळी कोट्यावधी लोकांपर्यंत आपल्या विषयीची माहिती आपल्या उद्योगाची माहिती पुरवण्याचे महत्वपूर्ण माध्यमाच्या स्वरुपात सोशल मिडिया विकसित झाला आहे. खर तर वर्तमानपत्र काय किवा दूरदर्शनची एखादी वाहिनी काय त्यांच्या प्रसारणालाच मुळातच मर्यादा असते . देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्या पर्यंत पोहोचु शकत नाही . ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते य़ाच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वर्तमानपत्राच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. न्यूयार्क टाईम्सच्या वेबसाईट वर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८  सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता.हे एक उदाहरण होत कि यावरून समाजात वेब मिडिया किती इतर माध्यमांना पूरक आहे याची माहिती मिळते.  
  खऱ्या अर्थाने

मल्टी मिडिया
सर्वसामान्याची पत्रकारिता हे खर तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभ राहण्याची शक्यता आहे . आजचे ब्लॉग्स हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वर्तमानपत्रे आणि वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकुर चित्रे छायाचित्रे विचार असा समृद्ध खजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे . इंटरनेट च्या पोटात अश्या प्रकारची छोटी मोठी माध्यमे ही आज परस्पर पूरक कार्य करताना दिसत आहेत आणि त्या मुळेच वेब मिडिया हा संपुर्ण जगाला एकत्र आणण्याचे महत्वाचे काम करत आहेत . माध्यम क्षेत्रात घडलेली ही चौथी आणि महत्वाची क्रांती जगाला एक नवीन विचार देत आहे . मात्र असे असले तरी या इंटरनेट ला मोठ्या प्रमाणावर मर्यादा ही आहेत की ज्यामुळे ते परिपूर्ण माध्यम आहे अस म्हणता येणार नाही. इंटरनेट अर्थात वेब मध्यम आज अनेकांच्या गळ्याचे ताईत बनले आहे . कारण आज जवळजवळ ९० टक्के जनता ही आज मोठ्या प्रमाणात नेट वापरले जाते. त्यामुळे पारंपारिक माध्यमे आणि आता आता नव्याने आलेलं इंटरनेटमाध्यम यांच्यात मोठ्या प्रमाणात इंटर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळते. आजचा समाज हा माध्यमांची कास धरून चालला आहे आणि त्यात माध्यम क्षेत्रात आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत आणि त्यातच माहिती तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वेब मिडिया मोठ्याप्रमाणावर वापरला जातो आणि विशेष म्हणजे लोकांच्या ते पसंतीस ही पडत आहे/ब्लॉग वेबसाईट फेसबुक अशी या वेब मिडियाची हत्यारे आहेत.

No comments:

Post a Comment