माध्यमांच्या शेत्रात शिकत असताना तसा मला अनेक
वेळा अनेक प्रसंगातून जावे लागले मात्र वेब मिडिया अर्थात इंटरनेट मिडिया हा
जेव्हा मी बी एम एम मध्ये असताना हाताळायला]सुरुवात केली तेव्हा मला त्याबद्दल
कुतूहल तर होतेच मात्र एक प्रकारची जिज्ञासा होती आणि त्या प्रसंगातूनच मला वेब
मिडिया चा खरा रस्ता खरी गरज कळली .
प्रसंग होता असा कि आम्हाला जनसंपर्काचा एक
प्रकल्प तयार करण्यास सांगितला होता आणि त्यात पीआर जे आसतात ते कोणकोणत्या
माध्यमांचा उपयोग करतात अशी माहिती हि मिळवायची होती सगळ्यांबरोबर मी पण कामाला
लागले मी महानगर पालिकेचा पीआर घेतला होता आणि ते लोक जनसंपर्कासाठी वेब मिडिया चा
वापर जास्तीत जास्त करतात अस मला समजल
मात्र त्या वेळी मला ते समजल नाही कि वेब मिडिया तर फक्त प्रकल्पाची माहिती
मिळवण्यासाठीच असते अस मला वाटायचं मात्र मी माझ्या सरांना ह्या बद्दल विचारलं
तेव्हा समजल कि वेब मिडिया म्हणजे संपूर्ण विश्वाची माहिती यात असते. विविध संस्था
विविध कार्यालय व्यवसाय विविध ठिकाणे विविध भागातील समस्या या सगळ्या गोष्टींचा
अंतर्भाव यात असतो आणि त्यामुळेच इंटरनेट मुळे जग अधिक जवळ आले आहें असे म्हंटले
जाते. आणि त्या वेळेला मला कळल कि माध्यमाचे
क्षेत्र जे आहे ते खूप विस्तारलेले आहे आणि त्यामुळेच आपल्याला एकाच जागी बसून
विविध गोष्टींची माहिती आपल्याला कळते आणि त्यामुळेच आपल्याला विविध गोष्टींचे
ज्ञान मिळतेहा खर तर प्रसंग खूप छोटा होता मात्र त्यातील मतितार्थ खूप मोठा होता
अनेकांना आज हि वेब म्हणजे फक्त फेसबुक chatting या गोष्टीच माहित असतात आणि आता whatsup हे नवीन प्रकरण
आलेलं माहित आहे किवा जर कोणता प्रकल्प दिला असेल तर त्या बद्दल ची माहिती गोळा
करण्यासाठी नेट चा वापर केला जातो मात्र इंटरनेट हि माध्यम जगतातील चौथी क्रांती
आहे हे आपणाला माहितीच नसते आणि या वेब मिडिया मुळे अनेक व्यवहार माहिती
समाजसुधारक कामे ही करता येतात असे मला त्या वेळी कळले आणि त्या मुळे वेब
मिडीयाच्या ताकदीचा अंदाज ही मला जाणवला. हा प्रसंग मला वेब मिडीयाच्या अधिक जवळ
घेऊन गेला आणि त्याचा सर्वांगीण वापर कसा करायचा याचीही प्रचीती मला आली
No comments:
Post a Comment