प्रसारमाध्यमांची मानसिकता विविध पक्षांच्या चरणी वाहिलेली आहे त्यांच्या अश्या वागण्याने समाजाला विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.प्रसारमाध्यमे इतिहास घडवत नाहीत, ते फक्त इतिहासाचे साक्षिदार ठरतात मात्र ते हा इतिहास घडवण्यात मोलाची भुमिका बजावत असतात
.विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वृत्तपत्रांनी,
वाहिन्यांनी ज्या प्रकारे वार्ता प्रसिद्ध करण्यासाठी वा न करण्यासाठी पैसे स्वीकारून पत्रकारितेतील एक अनिष्ट प्रथा रुढ करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ वेळच्या निवडणुकीत जो ‘पैशाचा खेळ’ झाला त्यात मिडिया फार काही मागे नव्हता. अर्थात सगळाच मिडिया या खेळात सहभागी झाला असे नाही म्हणता येणार. पण मोठय़ा प्रमाणावर उतरला होता एवढे नक्की.
पुन्हा छोटी मोठी लंगोटी वृत्तपत्रे अथवा स्थानिक चॅनेल्सच त्यात होती असेही नाही.
शक्तिशाली आणि मोठमोठी वृत्तपत्रे आणि चॅनेल्सही या खेळात उतरली होती.
अनेक उमेदवारांनी
‘खंडणीखोरी’ची तक्रार केली. परंतु मीडियाच्या भीतीने ही तक्रार तडीला नेण्याचे धैर्य कोणी दाखविले नाही हा भाग वेगळा.
या
पैशाच्या खेळाने अनेक वरिष्ठ,
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांनाही अडचणीत आणले आणि यातुनच माध्यमे कशी पूर्वग्रह दुषित आहेत याचा प्रत्यय येतो.
उमेदवार, पैसा, सेलिब्रिटी, प्रसार माध्यमे
या सगळ्या गोष्टी हातात घालून चालू लागल्या आहेत,
ही
दु:खाची बाब आहे. पैसा आणि मिडिया हे एका शेंगेतल्या दोन बियांसारखे बनले आहेत.
मात्र यामुळे छोटे,
पैसे खर्च करण्याची फारशी कुवत नसलेले आवाज पूर्णपणे दाबले जात आहेत हे कुणीच लक्षात घेत नाही.
याचा परिणाम सामान्य जनतेवरही होतो.
त्यांच्यासाठी लढणाऱ्यांचा आवाजच या प्रक्रियेत दाबला गेला आहे. ब्रायन नाईट आणि टीम ग्रोस्लोस यांनी केलेल्या रिसर्च मध्ये ही बाब पाहणीत आली की आताची माध्यमे ही पृवाग्रहादुषित आहेत आणि त्यामुळे
समाज हा दिशाहीन होत चालला आहे समाजात आज माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते आणि त्याच चौथ्या स्तंभाला आज अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध संस्था कीड लावत आहे आणि ही बाब अतिशय खेदजनक आहे यासाठी म्हणून २००४ मध्ये काही सर्वे केले गेले आणि त्यातून हे सिद्ध झाल आहे की माध्यमे ही एकाच प्रवाहाने जात आहेत आणि हा प्रवाह ज्यांनी त्यांना विकत घेतले आहे त्यांनी सांगितलेल्या दिशेने आहे आणि हे पत्रकारितेच्या दृष्टीने गुन्हा आहे.तरीही आजच्या घडीला हा प्रवास राजरोसपणे चालला आहे.त्यात एबीपी माझा कॉंग्रेस च्या बाजुने सामना शिवसेनेच्या बाजुने लोकमत कॉंग्रेस च्या बाजुने प्रहर नारायण राणेच्या बाजुने बोलताना दिसतात.कॅश फोर वोट या प्रकारात माध्यमांनी घेतलेली भूमिका ही खुप चुकीची होती.त्याच प्रमाणे पूर्वी पण दिल्ली मध्ये बलात्कार होत होते मात्र आताच ही बाब माध्यमे उचलुन धरत आहेत कारण ही बाब खुप मोठी झाली.त्याच प्रमाणे जेव्हा धरती बुडणार अशी अफवा आली तेव्हा माध्यमांनी पण समाजप्रबोधन न करता केवळ टीआरपी साठी ही बाब उचलुन धरली मात्र अशी धारणा करणे किवा असे वागणे हे समाजाबरोबरच माध्यमांसाठी ही हानिकारक आहे.त्यामुळे माध्यमांनी समाजाची गरज ओळखुन आणि स्वतःची जबाबदारी समजुन घेऊन आपले काम करणे गरजेचे आहे तरच समाज योग्य दिशेने प्रगती करू शकेल .
No comments:
Post a Comment