आतापर्यंतचे इलेट्रोनिक मिडिया म्हणजे
वर्तमानपत्र रेदिओ टीव्ही या सारखी माध्यमे फक्त प्रसारण करतात आपण एखादी बातमी
सिनेमा गाणे मुलाखत खेळ फक्त पाहू ऐकू किव्हा वाचू शकतो त्या बाबतचे आपले मत
किव्हा विचार त्या वेळेला आपणाला व्यक्त करता येत नाही किव्हा त्यावर प्रतिसाद देत
येत नाही कारण हा संवाद एकतर्फी असतो सोशल मिडिया मध्ये मात्र दुतर्फी संवाद
किव्हा प्रतिसाद आसतो आपण जी मते मांडतो ती सर्व जण वाचू शकतात पाहू शकतात त्यावर
लगेच स्वतचे मत मांडू शकतात अनुभव सांगू शकतात त्या गोष्टीबद्दल बातमीबद्दल
त्यांना काय वाटते ते त्या कडे कसे पाहतात याबद्दल त्याच्या पद्धतीने मुद्दे मांडू
शकतात वर्तमानपत्रासारख्या पारंपारिक मिडीयामध्ये असा संवाद होणे अवघड आहे. हि दरी
कमी करण्यासाठी वाल स्ट्रीट सारखी वर्तमानपत्रे सोशल मिडीयाचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात पारंपारिक मिडिया
पेक्षा सोशल मिडिया खूपच स्वस्त आहे व्ययक्तिक रीत्या तर मोफत आहे असेही आपण म्हणू
शकतो म्हणजे समजा तुम्हाला लिखाणाची आवड आहे पण पुस्तक प्रकाशित करण्यासाठी'अतिरिक्त पैसे आणि वेळ हि खर्च करणे
तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करून मजकूर लिहून वाचकांपर्यंत पोहोचू
शकता आणि तुमच्या चाहत्यांची संख्या वाढवू शकता. सोशल मिडिया मुळे संवादाबाबाताचा
संवादाबाबतचा आग्रहीपणा वाढला वाढला आहे सोशल मिडिया'हा सातत्यपूर्ण व न संपणारा माहितीचा स्त्रोत आहे. सर्वसामान्याची पत्रकारिता हे खर तर
उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभ राहण्याची शक्यता आहे . आजचे ब्लॉग्स हे
त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वर्तमानपत्रे आणि वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा
मजकुर चित्रे छायाचित्रे विचार असा समृद्ध खजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत
जाणार आहे . इंटरनेट च्या पोटात अश्या प्रकारची छोटी मोठी माध्यमे ही आज परस्पर
पूरक कार्य करताना दिसत आहेत आणि त्या मुळेच वेब मिडिया हा संपुर्ण जगाला एकत्र
आणण्याचे महत्वाचे काम करत आहेत . माध्यम क्षेत्रात घडलेली ही
चौथी आणि महत्वाची
क्रांती जगाला एक नवीन विचार देत आहे जवळजवळ ९० टक्के जनता हि इ इंटरनेटच्या आहारी गेली आहे ही बाब काही
अंशी घातक असली तरी समाज हा पुढे जाण्यासाठी आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी जे
विविध पैलूंचे ज्ञान आवश्यक आहे ते या वेब अर्थात इंटरनेट माध्यमातून मिळते.
No comments:
Post a Comment