Tuesday, 15 October 2013

वेब मिडीयामध्ये मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस



सोशल मिडिया
संगणकाच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांनी (सोशल मिडिया) आज जगभरात क्रांती घडवली आहे. विशेषतः तरुण वर्ग या माध्यमांकडे जास्त आकर्षित होत आहे. संगणकाचा प्रचार आणि प्रसार इतका झाला आहे कि आज ३० ते ४० टक्के मध्यमवर्गीयांच्या घरात संगणकाचा वापर केला जातो. याच संगणकाचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी,  मैत्रिणीशी,  नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी  सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते. सध्या जगभरात सामाजिक माध्यमांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.परंतु सामाजिक माध्यमांचा वापर करायचा असेल तर केवळ संगणक असून चालत नाही तर त्यासाठी इंटरनेटची सुविधा देखील असणे गरजेचे असते. फेसबुक, ट्वीटर, ऑर्कुट अथवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. अत्याधुनिक  तंत्राज्ञानाच्या सहायाने भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईल) देखील सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो. कधीही, कुठेही कितीही लांब असून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहता येते त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या घडामोडी काही सेकॅंदाच्या आत आपल्याला कळतात व त्यावर आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते हे याचे फायदे आहेत.परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात तसे या माध्यमांचे तोटे देखील आहेत. माणूस-माणसापासून तोडला जाणे (प्रत्यक्ष भेटी पेक्षा या माध्यमातून संपर्कात राहणे), फेसबुक अथवा ऑर्कुट वरील आपल्या प्रोफेलचा गैरवापर किंव्हा हेक होणे (विशेषतः मुलींचे) यांसारखे धोके पत्करण्याची तयारी या माध्यमांचा वापर करताना आपल्याला ठेवावी लागते. आधुनिक युगाच्या बरोबरीने जायचे असेल तर सामाजिक मध्यामंचा वापर करावाच लागेल, परंतु आपल्या वैयक्तिक गोष्टी समाजासमोर किती मांडायचा याचा देखील विचार करणे आवश्यक आहे.      

वेब  मिडीयामध्ये मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस, इंटरनेट म्हणजे पैसा कमावण्याचे एक प्रमुख साधन ही इंटरनेटची नविन व्याख्या आपण लवकरात लवकर आत्मसात केली पाहिजे. इंटरनेटवर चहुबाजुला व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत, डोळसपणे त्यांच्याकडे पहायला सुरुवात केली पाहिजे. मध्यामची गरज त्यांची उपलब्धता आणि त्याची मर्यादा लक्षात घेऊन समाजात माध्यमांचा वापर करणे फायद्याचे ठरते खर पाहता सोशल मिडिया हे तंत्रज्ञान आणि वेब वर आधारित टूल आहे सामाजिक परस्पर संवाद जे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांचे अनुभव विचार मते एकमेकांपर्यंत पोहोचवते अनुभूती देते सोशल मिडिया वेब साईट या लोकांनी लोकांसाठी तयार केलेल्या आसतात. सोशल मिडिया म्हणजे नुसते सोशल नेट वर्किंग न्हवे तर त्या हि पेक्षा बरेच काही आहे लोकांना आपली मते व्यक्त करता येतील आणि माहितीची देवाण घेवाण करता येयील आश्या अनेक वेब साईट चे एकत्रीकरण म्हणजे सोशल मिडिया होय

No comments:

Post a Comment