Tuesday, 15 October 2013

माध्यमे ही परिणामकारक आहेत



खरे पाहता प्रसारमाध्यमांना सामाजिक बदलाची माध्यमे म्हणून संबोधले जाते.डेनिस मक्वेल माध्यमांना इंजिन ऑफ सोशल चेंज असे म्हणतात आज प्रसारमाध्यमाचे स्वरूप बहुआयामी बहुउदेशीय झाले आहे.माध्यमे अधिक गतिमान अधिक व्यापक अधिक परिणामकारक झाली आहेत. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोगही होताना दिसत आहे. त्याचे अनेक परिणाम उदाहरणे समोर आल्याने समाजात एक अस्वस्थता आहे. विशेष करून युवकवर्गाला अमली पदार्थाच्या व्यसनात गुंतविण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तसेच अश्लील संदेशांची देवाण-घेवाण त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी स्वरूपाची गुंतागुंत ही चिंतेचा विषय बनली आहे. जग जवळ आले ; पण माणसे मात्र एकमेकांपासून दूर गेली असे दिसते. ही भावनिक अलगता अनेक सामाजिक ताणतणाव निर्माण करीत आहे. परस्परांशी बोलायला , समजून घ्यायला , वेळ नाही किंवा त्याची आवश्यकता नाही , यातूनदेखील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहे.माध्यमे ही परिणामकारक आहेत मात्र ती काही प्रमाणात समाज विघातक ही आहेत. डेनिस मक डोनाल्ड यांनी जो रिसर्च मांडला या नुसार विसाव्या शतकातील माध्यमांचा विचार केला तर ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात माध्यमांनी महत्वाची भुमिका बजावली तशी आता माध्यमे ही जास्त करून नफा आणि तोटा याचा जास्त विचार करताना दिसतात त्यामुळेच की काय आज माध्यमांवर ताशेरे ओढले जात आहेत.मात्र प्रसार माध्यमांचे सर्वात महत्वाचे आव्हान कोणते असेल तर राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले पाहिजे. समाजजीवनातील उत्तमोत्तम सद्गुणाची जोपासना प्रसिद्धी माध्यमांनी करावी. लोकशिक्षण, राजकीय शिक्षण, सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उद्बोधन, सांस्कृतिक अभियान अशा गोष्टींसाठी वेळ प्रसार-माध्यमांनी दिला पाहिजे. माध्यमे ही आज सर्वसामान्यांच्या जीवनात आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे.म्हणूनच की काय समाजाची निर्मिती व्यवस्थेमध्ये माध्यमे ही हातभार लावत आहेत. या साठी ज्या रिसर्च पेपर चा आढावा घेतला तेव्हा लक्षात आले की माध्यमांचा परिणाम अभ्यासताना अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून लोकांवरील परिणाम दर्शवला आणि निष्कर्ष काढला. खरे पाहता माध्यमांचा परिणाम हा हायपोडर्मिक मॉडेल प्रमाणे आहे ज्या प्रमाणे सुई द्वारे एखादे औषध थेट शरीरात जाते त्या प्रमाणे माध्यमांचा परिणाम ही थेट लोकांच्या मनावर होत असतो. माध्यमांचा परिणाम हा व्यक्ती नुरूप हा बदलत असतो मात्र त्यात ही माध्यमांमधील काय स्वीकारावे आणि काय स्वीकारू नये आणि मुलांना ही काय पाहायला द्यावे हे सर्वस्वी आपल्यावर आहे आणि त्यानुसार माध्यमाचा चांगला किवा वाईट परिणाम हा आपल्यावर पडेल

1 comment: