Tuesday, 15 October 2013

इंटरनेट व सोशल मीडिया एक "अस्तित्व'



इंटरनेट व सोशल मीडिया आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. लोकांचे मोठ्या संख्येने इंटरनेटवरील अनेक सोशल साईटवरून एक "अस्तित्व' तयार झाले आहे. 2012 च्या अखेरीस उपलब्ध असलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे 14 कोटी लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. इंटरनेटवरील सोशल मीडिया हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करण्यासाठी अर्थातच इंटरनेट जोडणी, लॅपटॉप, कंप्युटर, अतिप्रगत मोबाईल फोन यांची गरज असते. इसवीसन २००० आणि २०१० या एका दशकात इंटरनेटचा वापर करणार्‍या भारतातील लोकांच्या संख्येत १४०० टक्के वाढ झाली आहे. मात्र इंटरनेट जो़डणी भारतात सर्वदूर पोचलेली नाही. भारतातील इंटरनेट जोडणीचा प्रसार ८ टक्के आहे तर चीनमध्ये ४० टक्के आहे. अर्थातच भारतातील बहुसंख्य जनता अजूनही सामाजिक प्रसारमाध्यमांच्या कक्षेत आलेली नाही. मात्र मोबाईल फोनचा सर्वदूर प्रसार झाल्याने दिडके संदेश (एसएमएस) मात्र भारतात सर्वदूर पोचतात. आणि दिडक्या संदेशांचा समावेश ट्विटरप्रमाणेच सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये वा नव्या प्रसारमाध्यमांमध्ये होतो. या प्रसारमाध्यमांचा कल्पकतेने उपयोग केल्याने अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीला देशव्यापी पाठिंबा मिळाला. कोणताही मूलगामी विचार, संघटना नसतानाही देशव्यापी आंदोलन वा जागृती घडून आली. . मध्यामची गरज त्यांची उपलब्धता आणि त्याची मर्यादा लक्षात घेऊन समाजात माध्यमांचा वापर करणे फायद्याचे ठरते खर पाहता सोशल मिडिया हे तंत्रज्ञान आणि वेब वर आधारित टूल आहे सामाजिक परस्पर संवाद जे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांचे अनुभव विचार मते एकमेकांपर्यंत पोहोचवते अनुभूती देते सोशल मिडिया वेब साईट या लोकांनी लोकांसाठी तयार केलेल्या आसतात. सोशल मिडिया म्हणजे नुसते सोशल नेट वर्किंग न्हवे तर त्या हि पेक्षा बरेच काही आहे लोकांना आपली मते व्यक्त करता येतील आणि माहितीची देवाण घेवाण करता येयील आश्या अनेक वेब साईट चे एकत्रीकरण म्हणजे सोशल मिडिया होय . पारंपरिक प्रसारमाध्यमे, राजकीय व्यवस्था यांच्यासमोर मुक्त माध्यमांनी नवे आव्हान उभे केले आहे. युरोप व अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आज मुक्त माध्यमांमुळे जाहिरातीच्या व्यवसायाला ग्रहण लागले म्हणून ओरड करीत आहेत तर इजिप्तमधील ताहीर चौकात झालेली क्रांती व मुक्त माध्यमांमुळे भारतात अण्णांच्या आंदोलनाला मिळालेले पाठबळ यामुळे राजकीय व्यवस्थांसमोर मोठे प्रश्न उभे राहीले आहेत. मुक्त माध्यमांना कसे हाताळायचे हा मोठा पेच सध्या अनेकांसमोर  आहे मात्र हि माध्यमे आज नवीन नवीन प्रगतीची दालने खुली करून देत आहेत हे मात्र तीतकच खरे आहे

No comments:

Post a Comment