
युनायटेड स्टेट्स मध्ये दर आठवड्याच्या ऑनलाईन ट्रॅफीकचा अभ्यास केल्यावर
असे लक्शात येते की गुगल वापरणार्यांपेक्षा फेसबुक वापरणार्या नेटीझन्सची संख्या
जास्त आहे.
पुर्वी इंटरनेटचा सर्वाधिक वापर सेक्सविषयक वेबसाईट्स (Porn) पाहण्यासाठी
केला जात असे मात्र सोशल नेटवर्कींगने त्यावरही मात केली आहे.
गेल्या वर्षी फेसबुक वापरणार्यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची
भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते हे त्या देशाचे नागरीक
आहेत असे गृहीत धरले तर फेसबुक हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश झाला असता. म्हणजे
फक्त भारत आणि चीन पेक्षा मागे आणि युनायटेड स्टेट्सच्याही पुढे.
जगभरातील ८०% कंपन्या भरतीसाठी (Recruitment) सोशल मिडियाचा
वापर करतात आणि त्यापैकी ९५% कंपन्या यासाठी linkedIn या सर्वात
मोठ्या प्रोफेशनल सोशल नेटवर्कचा वापर करतात.
हि सगळी माहिती सांगण्याचे
महत्वाचे कारण म्हणजे यावरून आपल्या लक्षात येयील कि सोशल मेडिया आता एक नवी शक्ती
बनुन येत आहे ह्यात शंकाच नाही.मुंबईतील ह्याच सर्वोत्त्म उदाहरण म्हणजे २६/११
च्या दहशतवादी हल्यानंतर कोणीही आयोजक नसताना नसताना ३ डिसेंबरला दहशतवादाचा निषेध
करण्यासाठी गेट वे ऑह ईंडियावर जमलेले लाखो भारतीय. ह्या एकत्र येण्याबद्द्ल
सर्वप्रथम आवाहन करण्यात आलं फेसबुकवरुन आणि त्यानंतर ऑर्कुट ,ईमेल
, एस. एम. एस. अश्या सगळ्या माध्यमातुन हे आवाहन पसरत गेलं.फेसबुकवरील
एक मेसेज खुप काही करु शकतो हेच यातुन दिसुन येत.हीच
ताकद वेब मिडिया ची आपल्याला पाहायला मिळते. मात्र तरीही काही या वेब मिडिया च्या मर्यादा आहेतईंटरनेट हा शतकातील सर्वात मोठा शोध आहे यात कोणतीही शंका नाही. ईंटरनेट ने माहितीचा प्रचंड साठा आपल्यासमोर आणला.पुर्ण जग खर्या अर्थाने जवळ आणलं. परंतु खरच या शोधाचा फायदा पुर्ण जगाला, जगातील प्रत्येकाला घेता आलाय का ?दुर्दैवाने याचे उत्तर आजही नाहीच आहे. अजुनही ईंटरनेट जगातील असंख्य लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही.आतापर्यंत जगातील फक्त ३०% लोक ईंटरनेट वापरु शकले आहेत.याची कारणे बरीच आहेत. पण मुख्य कारणे आहेत ईंटरनेट्ची न परवडणारी किंमत आणि गावागावात, अनेक दुर्गम भागात ईंटरनेट जोडणी पोहोचवण्यात येणार्या अडचणी. यावरून वेब मिडिया ची उपलब्धता त्याची पोहोच आणि त्याच्या मर्यादा याची जाणीव आपल्याला समजते.
No comments:
Post a Comment