इंटरनेट आणि भाषा
इंटरनेट म्हंटल कि इंग्लिश अपरिहार्य आहे आणि त्यामुळेच
भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील अस वाटल होत मात्र त्यात हि आता हिंदी
मराठी अगदी बंगाली तमिळ तेलगु या सारख्या भाषांचे युनिकोड झाल्यामुळे आज लाखो
लोकांना या वेब मिडिया चा वापर सहज करणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे आपापल्या
मातृभाषेतून अनेकांचे लिखाण ही आपल्याला पाहायला मिळते आणि वेब मिडिया मुळे
जगभरातील लोकांना ही त्याचा आस्वाद घेता येतो . इंटरनेटने इंग्लिश भाषेचा अडथळा
मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरच क्रांतिकारक
आहे १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट आज संपूर्ण भारतावर राज्य करत आहे आणि हे यश
संपादन करण्यासाठी भाषा हा जो महत्वाचा घटक होता त्यासंबंधी योग्य ती पावले उचलली गेली
आहेत आणि त्यामुळेच वेब मिडिया चे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसते
. भाषा हा सर्वात महत्वाचा घटक आज भारतात अत्यंत गरजेचा मानला जातो . याच
भाषेमुळे पूर्वी वयस्कर लोकांना इंटरनेट वापरण्यामध्ये अडथळा यायचा आणि त्यामुळेच
मोठ्या प्रमाणावर लोक या इंटरनेट पासून दुर होते म्हणूनच कि काय या वेब माध्यमांनी
यामधील उणीवा शोधून'काढल्या'आणि त्यातूनच मग त्या त्या प्रांतातील भाषा इंटरनेट ने
उपलब्ध करून दिली आणि काय चमत्कार इंटरनेट चे उपभोक्ते वाढले आणि साहजिकच इंटरनेट
म्हणजेच वेब मिडिया हा जगभरात प्रसिद्ध झाला आणि जग हे अधिक अधिक अधिकच जवळ
आलेभाषेचा हाच वापर करून मग लोकांनी जगभरात वेब मिडिया च्या द्वारे संचार करायला
सुरुवात केली घर बसल्या जगातील घडामोडी समजू लागल्या आणि नवनवीन तंत्रज्ञान आणि
त्या बद्दलची माहिती हि लोकांना समजु लग लागली आणि लोक विचारांनी कृतीने अधिक
प्रगत झाले आज जवळजवळ ९० टक्के जनता हि इ इंटरनेटच्या आहारी गेली आहे ही बाब काही
अंशी घातक असली तरी समाज हा पुढे जाण्यासाठी आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी जे
विविध पैलूंचे ज्ञान आवश्यक आहे ते या वेब अर्थात इंटरनेट माध्यमातून मिळते आणि
यासाठी भाषा हा घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो यात शंका नाही . म्हणून
इंटरनेट आणि भाषा या गोष्टी परस्पर पूरक
अश्या आहेत आणि त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणावर वापर हा वाढताना आपल्याला दिसत आहे.

No comments:
Post a Comment