Tuesday, 15 October 2013

संवादाबाबतचा आग्रहीपणा



सोशल मिडिया मुळे संवादाबाबाताचा

संवादाबाबतचा आग्रहीपणा वाढला वाढला आहे सोशल मिडिया'हा सातत्यपूर्ण व न संपणारा  माहितीचा स्त्रोत आहे सोशल मिडियाचे अनेक फायदे आहेत , तसे तोटेही होत आहे. गुन्हेगारी कृत्यासाठी , समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वा दुस-यास नुकसान होईल , असे कृत्य करण्यासाठी काही समाजकंटक त्याचा गैरवापर करतात. अशा घटनामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करताना अधिक सजग असावे . आजकालच्या जगात सोशल नेटवर्किंगनं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.mobile वर सर्वांना संदेश पाठवण्यापेक्षा यावर आपलं  " स्टेटस " अपडेट केलं कि माहिती एकाच वेळी अधिक वेगाने आणि सर्व मित्रान पर्यंत पोहचते.असो पण सद्ध्यातरी फेसबुकचं नाव आघाडीवर आहे.काही वर्षांपूर्वी चार नौजवान पोरांनी लाँच केलेली ही वेबसाइट आज जगभरातल्या आबालवृद्ध नेटिझन्सच्या गळ्यातली ताईत बनली आहे.सध्या देशात दैनंदिन 'सोशल नेटवर्किंग'चा वापर करणाऱ्यांची संख्या अंदाजे ३ कोटी असून, त्यांचा दिवसातील बराचसा वेळ 'सोशल मिडिया नेटवर्किंग', वैयक्तिक 'ई मेल' तपासणे आणि 'इंटरनेट'शी संबंधित अन्य गोष्टी करण्यात जात असल्याचे निरीक्षण मार्केट रिसर्च फर्म 'निल्सन' आणि 'अॅब्सोल्युटडेटा' यांनी केलेल्या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. एकूण 'इंटरनेट युजर्स'पैकी ८ टक्के 'युजर्स' हे तीन तासांमधील किमान एक तास त्यांचे 'ई मेल' तपासण्यासाठी, तर २० टक्के 'युजर्स' सरासरी तेवढाच वेळ 'सोशल मिडिया नेटवर्किंग'साठी खर्ची घालत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. या पाहणीअतंर्गत देशातील पाच प्रमुख महानगरे आणि प्रथम श्रेणीच्या शहरांतील २००० व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. अभ्यासात आढळून आलेली सर्वांत विलक्षण गोष्ट म्हणजे 'सोशल मिडिया नेटवर्किंग'चा आणि काही 'ऑनलाइन साइट्स'चा सर्वांत जास्त उपयोग 'मेसेज' पाठविण्यासाठी होत आहे. एकूणातील ८२ टक्के 'युजर्स' हे सोशल मिडिया नेटवर्कच्या माध्यमातून 'मेसेजेस' पाठवतात. मात्र सावधान तुम्हाला जर वाटत असेल कि येणाऱ्या काळात सोशल मिडिया ला खूप महत्व प्राप्त होईल तर तुम्ही चुकत आहात कारण हि गोष्ट येउन उभी राहिली आहे एकतर तुम्ही त्यावर स्वार व्हा किव्हा त्याचा सामना करा  कारण जे बरोबर येतील त्यांना घेऊन सोशल मिडिया भरधाव वेगाने पुढे निघून जाईल आणि आपण तिथेच राहू आणि त्यामुळे आजच्या युगात या मिडिया च्या बरोबरीने काम करणे आणि त्याचा योग्य तो वापर करून विकास सध्य करणे अत्यंत गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment