Tuesday, 15 October 2013

माध्यमांच्या देशा




          माध्यमांचे विकेंद्रीकरण आज मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसत आहे प्रत्येक माध्यम हे एकमेकांशी पूरक असेच आहेत आणि त्यामुळे माध्यम क्षेत्रात जे काही बदल होत आहेत त्याचा परिणाम हा मध्यामाबरोबर समाजावरही होतो कारण माध्यमे ही समाज मनाचा आरसा आहे आहे आणि त्यामुळेच समाजाचे प्रतिनिधित्व हे माध्यमाच्या द्वारे होत असत आणि त्यामुळेच समाजात होणाऱ्या प्रत्येक घटनेचा परामर्श हा माध्यमांमध्ये दिसत असतो आणि माध्यमांना ही त्याची दखल ही घ्यावीच लागते. कोणत्याही प्रकारचे माध्यम हे समाजाचे प्रतिबिंब असते समाजातील सर्व चांगल्या वाईट घटनांचा आढावा हा माध्यमे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत असतो.पूर्वी माध्यमे हे समाज प्रबोधनाचे काम करत होती मात्र काळानुसार त्यात ही बदल झाले आणि केवळ टी.आर.पीसाठी माध्यमांचे कामकाज सुरु झाले.ज्या प्रमाणे वर्तमानपत्र रेडीओ मोबाईल यांनी आपले प्रस्थ समाजात बसवले आहे त्या प्रमाणे दूरदर्शन या माध्यमाचा परिणाम तर आज खेड्यापाड्यात तर आहेच पण कोसमोपोलीटीएन शहरात ही याचा ही परिणाम इतका झाला आहे की आज जवळ जवळ ७० टक्के जनता यावरच विसंबून आहे.मात्र याचा जसा चांगला परिणाम समाजावर झाला आहे तसाच वाईट परिणाम ही समाजावर तितकाच झाला आहे.  कोणत्याही प्रकारचे माध्यम हे समाजाचे प्रतिबिंब असते समाजातील सर्व चांगल्या वाईट घटनांचा आढावा हा माध्यमे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत असतो.पूर्वी माध्यमे हे समाज प्रबोधनाचे काम करत होती मात्र काळानुसार त्यात ही बदल झाले आणि केवळ टी.आर.पीसाठी माध्यमांचे कामकाज सुरु झाले.ज्या प्रमाणे वर्तमानपत्र रेडीओ मोबाईल यांनी आपले प्रस्थ समाजात बसवले आहे त्या प्रमाणे दूरदर्शन या माध्यमाचा परिणाम तर आज खेड्यापाड्यात तर आहेच पण कोसमोपोलीटीएन शहरात ही याचा ही परिणाम इतका झाला आहे की आज जवळ जवळ ७० टक्के जनता यावरच विसंबून आहे.मात्र याचा जसा चांगला परिणाम समाजावर झाला आहे तसाच वाईट परिणाम ही समाजावर तितकाच झाला आहे.  आजची मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमे वा सोशल नेटवर्किंगची माध्यमे ही वाचकाला, पाहणाऱ्याला सहभागी होणाऱ्याला एखाद्या विषयाची सर्वांगीण माहिती देऊन चिंतनशीलतेला वाव देणे आवश्यक समजत नाहीत. माहितीचा वा मतांचा मारा इतक्या वेगाने होतो की, त्याचा ऐकणाऱ्याच्या वा वाचणाऱ्याच्या मनावर अत्यंत तात्पुरता परिणाम होतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही की, विविध विषयासंबंधीची वा समस्यांसंबंधीच्या माहितीचा परस्पर संबंध दर्शवून देण्याची कोणतीही योजना वा व्यवस्था या तिन्ही माध्यमांमध्ये दिसून येत नाही.

एक प्रसंग





माध्यमांच्या शेत्रात शिकत असताना तसा मला अनेक वेळा अनेक प्रसंगातून जावे लागले मात्र वेब मिडिया अर्थात इंटरनेट मिडिया हा जेव्हा मी बी एम एम मध्ये असताना हाताळायला]सुरुवात केली तेव्हा मला त्याबद्दल कुतूहल तर होतेच मात्र एक प्रकारची जिज्ञासा होती आणि त्या प्रसंगातूनच मला वेब मिडिया चा खरा रस्ता खरी गरज कळली .
प्रसंग होता असा कि आम्हाला जनसंपर्काचा एक प्रकल्प तयार करण्यास सांगितला होता आणि त्यात पीआर जे आसतात ते कोणकोणत्या माध्यमांचा उपयोग करतात अशी माहिती हि मिळवायची होती सगळ्यांबरोबर मी पण कामाला लागले मी महानगर पालिकेचा पीआर घेतला होता आणि ते लोक जनसंपर्कासाठी वेब मिडिया चा वापर जास्तीत जास्त   करतात अस मला समजल मात्र त्या वेळी मला ते समजल नाही कि वेब मिडिया तर फक्त प्रकल्पाची माहिती मिळवण्यासाठीच असते अस मला वाटायचं मात्र मी माझ्या सरांना ह्या बद्दल विचारलं तेव्हा समजल कि वेब मिडिया म्हणजे संपूर्ण विश्वाची माहिती यात असते. विविध संस्था विविध कार्यालय व्यवसाय विविध ठिकाणे विविध भागातील समस्या या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव यात असतो आणि त्यामुळेच इंटरनेट मुळे जग अधिक जवळ आले आहें असे म्हंटले जाते. आणि त्या वेळेला मला कळल कि माध्यमाचे क्षेत्र जे आहे ते खूप विस्तारलेले आहे आणि त्यामुळेच आपल्याला एकाच जागी बसून विविध गोष्टींची माहिती आपल्याला कळते आणि त्यामुळेच आपल्याला विविध गोष्टींचे ज्ञान मिळतेहा खर तर प्रसंग खूप छोटा होता मात्र त्यातील मतितार्थ खूप मोठा होता अनेकांना आज हि वेब म्हणजे फक्त फेसबुक chatting या गोष्टीच माहित असतात आणि आता whatsup हे नवीन प्रकरण आलेलं माहित आहे किवा जर कोणता प्रकल्प दिला असेल तर त्या बद्दल ची माहिती गोळा करण्यासाठी नेट चा वापर केला जातो मात्र इंटरनेट हि माध्यम जगतातील चौथी क्रांती आहे हे आपणाला माहितीच नसते आणि या वेब मिडिया मुळे अनेक व्यवहार माहिती समाजसुधारक कामे ही करता येतात असे मला त्या वेळी कळले आणि त्या मुळे वेब मिडीयाच्या ताकदीचा अंदाज ही मला जाणवला. हा प्रसंग मला वेब मिडीयाच्या अधिक जवळ घेऊन गेला आणि त्याचा सर्वांगीण वापर कसा करायचा याचीही प्रचीती मला आली

इंटरनेट आणि भाषा



इंटरनेट म्हंटल कि  इंग्लिश अपरिहार्य आहे आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील अस वाटल होत मात्र त्यात हि आता हिंदी मराठी अगदी बंगाली तमिळ तेलगु या सारख्या भाषांचे युनिकोड झाल्यामुळे आज लाखो लोकांना या वेब मिडिया चा वापर सहज करणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे आपापल्या मातृभाषेतून अनेकांचे लिखाण ही आपल्याला पाहायला मिळते आणि वेब मिडिया मुळे जगभरातील लोकांना ही त्याचा आस्वाद घेता येतो . इंटरनेटने इंग्लिश भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरच क्रांतिकारक आहे १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट आज संपूर्ण भारतावर राज्य करत आहे आणि हे यश संपादन करण्यासाठी भाषा हा जो महत्वाचा घटक होता त्यासंबंधी योग्य ती पावले उचलली गेली आहेत आणि त्यामुळेच वेब मिडिया चे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसते . भाषा हा सर्वात महत्वाचा घटक आज भारतात अत्यंत गरजेचा मानला जातो . याच भाषेमुळे पूर्वी वयस्कर लोकांना इंटरनेट वापरण्यामध्ये अडथळा यायचा आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक या इंटरनेट पासून दुर होते म्हणूनच कि काय या वेब माध्यमांनी यामधील उणीवा शोधून'काढल्या'आणि त्यातूनच  मग त्या त्या प्रांतातील भाषा इंटरनेट ने उपलब्ध करून दिली आणि काय चमत्कार इंटरनेट चे उपभोक्ते वाढले आणि साहजिकच इंटरनेट म्हणजेच वेब मिडिया हा जगभरात प्रसिद्ध झाला आणि जग हे अधिक अधिक अधिकच जवळ आलेभाषेचा हाच वापर करून मग लोकांनी जगभरात वेब मिडिया च्या द्वारे संचार करायला सुरुवात केली घर बसल्या जगातील घडामोडी समजू लागल्या आणि नवनवीन तंत्रज्ञान आणि त्या बद्दलची माहिती हि लोकांना समजु लग लागली आणि लोक विचारांनी कृतीने अधिक प्रगत झाले आज जवळजवळ ९० टक्के जनता हि इ इंटरनेटच्या आहारी गेली आहे ही बाब काही अंशी घातक असली तरी समाज हा पुढे जाण्यासाठी आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी जे विविध पैलूंचे ज्ञान आवश्यक आहे ते या वेब अर्थात इंटरनेट माध्यमातून मिळते आणि यासाठी भाषा हा घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो यात शंका नाही . म्हणून इंटरनेट आणि भाषा या गोष्टी परस्पर  पूरक अश्या आहेत आणि  त्यामुळेच आज मोठ्या  प्रमाणावर वापर हा  वाढताना आपल्याला दिसत  आहे.


मल्टी मिडिया



सोशल मिडिया आज प्रत्येक नेट स्यावी च्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे . इंटरनेट वापरणारे आज ९९ टक्के लोक आज सोशल मीडियाशी कनेक्टेड असून एकाच वेळी कोट्यावधी लोकांपर्यंत आपल्या विषयीची माहिती आपल्या उद्योगाची माहिती पुरवण्याचे महत्वपूर्ण माध्यमाच्या स्वरुपात सोशल मिडिया विकसित झाला आहे. खर तर वर्तमानपत्र काय किवा दूरदर्शनची एखादी वाहिनी काय त्यांच्या प्रसारणालाच मुळातच मर्यादा असते . देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्या पर्यंत पोहोचु शकत नाही . ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते य़ाच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वर्तमानपत्राच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. न्यूयार्क टाईम्सच्या वेबसाईट वर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८  सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता.हे एक उदाहरण होत कि यावरून समाजात वेब मिडिया किती इतर माध्यमांना पूरक आहे याची माहिती मिळते.  
  खऱ्या अर्थाने

मल्टी मिडिया
सर्वसामान्याची पत्रकारिता हे खर तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभ राहण्याची शक्यता आहे . आजचे ब्लॉग्स हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वर्तमानपत्रे आणि वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकुर चित्रे छायाचित्रे विचार असा समृद्ध खजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे . इंटरनेट च्या पोटात अश्या प्रकारची छोटी मोठी माध्यमे ही आज परस्पर पूरक कार्य करताना दिसत आहेत आणि त्या मुळेच वेब मिडिया हा संपुर्ण जगाला एकत्र आणण्याचे महत्वाचे काम करत आहेत . माध्यम क्षेत्रात घडलेली ही चौथी आणि महत्वाची क्रांती जगाला एक नवीन विचार देत आहे . मात्र असे असले तरी या इंटरनेट ला मोठ्या प्रमाणावर मर्यादा ही आहेत की ज्यामुळे ते परिपूर्ण माध्यम आहे अस म्हणता येणार नाही. इंटरनेट अर्थात वेब मध्यम आज अनेकांच्या गळ्याचे ताईत बनले आहे . कारण आज जवळजवळ ९० टक्के जनता ही आज मोठ्या प्रमाणात नेट वापरले जाते. त्यामुळे पारंपारिक माध्यमे आणि आता आता नव्याने आलेलं इंटरनेटमाध्यम यांच्यात मोठ्या प्रमाणात इंटर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळते. आजचा समाज हा माध्यमांची कास धरून चालला आहे आणि त्यात माध्यम क्षेत्रात आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत आणि त्यातच माहिती तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वेब मिडिया मोठ्याप्रमाणावर वापरला जातो आणि विशेष म्हणजे लोकांच्या ते पसंतीस ही पडत आहे/ब्लॉग वेबसाईट फेसबुक अशी या वेब मिडियाची हत्यारे आहेत.