Tuesday, 15 October 2013

चौथी आणि महत्वाची क्रांती



आतापर्यंतचे इलेट्रोनिक मिडिया म्हणजे वर्तमानपत्र रेदिओ टीव्ही या सारखी माध्यमे फक्त प्रसारण करतात आपण एखादी बातमी सिनेमा गाणे मुलाखत खेळ फक्त पाहू ऐकू किव्हा वाचू शकतो त्या बाबतचे आपले मत किव्हा विचार त्या वेळेला आपणाला व्यक्त करता येत नाही किव्हा त्यावर प्रतिसाद देत येत नाही कारण हा संवाद एकतर्फी असतो सोशल मिडिया मध्ये मात्र दुतर्फी संवाद किव्हा प्रतिसाद आसतो आपण जी मते मांडतो ती सर्व जण वाचू शकतात पाहू शकतात त्यावर लगेच स्वतचे मत मांडू शकतात अनुभव सांगू शकतात त्या गोष्टीबद्दल बातमीबद्दल त्यांना काय वाटते ते त्या कडे कसे पाहतात याबद्दल त्याच्या पद्धतीने मुद्दे मांडू शकतात वर्तमानपत्रासारख्या पारंपारिक मिडीयामध्ये असा संवाद होणे अवघड आहे. हि दरी कमी करण्यासाठी वाल स्ट्रीट सारखी वर्तमानपत्रे सोशल मिडीयाचा पुरेपूर  उपयोग करून घेताना दिसतात पारंपारिक मिडिया पेक्षा सोशल मिडिया खूपच स्वस्त आहे व्ययक्तिक रीत्या तर मोफत आहे असेही आपण म्हणू शकतो म्हणजे समजा तुम्हाला लिखाणाची आवड आहे पण पुस्तक प्रकाशित करण्यासाठी'अतिरिक्त पैसे आणि वेळ हि खर्च करणे तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करून मजकूर लिहून वाचकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या चाहत्यांची संख्या वाढवू शकता. सोशल मिडिया मुळे संवादाबाबाताचा संवादाबाबतचा आग्रहीपणा वाढला वाढला आहे सोशल मिडिया'हा सातत्यपूर्ण व न संपणारा  माहितीचा स्त्रोत आहे. सर्वसामान्याची पत्रकारिता हे खर तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभ राहण्याची शक्यता आहे . आजचे ब्लॉग्स हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वर्तमानपत्रे आणि वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकुर चित्रे छायाचित्रे विचार असा समृद्ध खजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे . इंटरनेट च्या पोटात अश्या प्रकारची छोटी मोठी माध्यमे ही आज परस्पर पूरक कार्य करताना दिसत आहेत आणि त्या मुळेच वेब मिडिया हा संपुर्ण जगाला एकत्र आणण्याचे महत्वाचे काम करत आहेत . माध्यम क्षेत्रात घडलेली ही
चौथी आणि महत्वाची क्रांती जगाला एक नवीन विचार देत आहे जवळजवळ ९० टक्के जनता हि इ इंटरनेटच्या आहारी गेली आहे ही बाब काही अंशी घातक असली तरी समाज हा पुढे जाण्यासाठी आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी जे विविध पैलूंचे ज्ञान आवश्यक आहे ते या वेब अर्थात इंटरनेट माध्यमातून मिळते.

नेटवर्क म्हणजे इंटरनेट



जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे

नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले.इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे. आज जगात माहितीचा स्फोट झाला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले असून, माहीती ही ठराविक वर्गाची मक्तेदारी राहीली नाही, इंटरनेट व सोशल नेट वर्किंग माध्यमांचा वापर पर्यायी माध्यमम्हणून करून लोकांच्या प्रश्न एरणीवर आणणे ही  काळाची गरज ठरली आहे. आज इंटरनेट हा माहितीचा मायाजाल म्हणून समजले जाते प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती हि या मायाजालातून मिळते आणि त्यामुळेच इतर माध्यमांपेक्षा हे वेब माध्यम अत्यंत प्रसिद्ध पावले आहे आणि त्यामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट, फेसबुक, टवीटर, एसएमएस, कॅमेरा, व्हिडीओ, मल्टीमिडीया प्लेयर, इत्यादिचा वापर आज प्रामुख्याने होत आहे. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच चुकीचे व गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. या सुविधांचा समाजावर वाईट परिणामपडत आहे.फेसबुकसारख्या सुविधामुळे हिंसाचार, एखाद्याचा मानसिक छळ यासारखे प्रकार घडताना दिसत आहे. माध्यमांच्या या दुनियेत अनेकदा मोठ्या प्रमाणावर फायदे आणि तोटे  आपल्याला पाहायला मिळते पारंपारिक मिडीयामध्ये फक्त एकाच बाजूने प्रसारण होते मात्र ते एकतर्फी असते सोशल मिडीयामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिसाद व संवाद असतो आजच्या युगात या मिडिया च्या बरोबरीने काम करणे आणि त्याचा योग्य तो वापर करून विकास सध्य करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अस जरी  असल तरी आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट, फेसबुक, टवीटर, एसएमएस, कॅमेरा, व्हिडीओ, मल्टीमिडीया प्लेयर, इत्यादिचा वापर आज प्रामुख्याने होत आहे. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच चुकीचे व गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. या सुविधांचा समाजावर वाईट परिणामपडत आहे.

इंटरनेट व सोशल मीडिया एक "अस्तित्व'



इंटरनेट व सोशल मीडिया आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. लोकांचे मोठ्या संख्येने इंटरनेटवरील अनेक सोशल साईटवरून एक "अस्तित्व' तयार झाले आहे. 2012 च्या अखेरीस उपलब्ध असलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे 14 कोटी लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. इंटरनेटवरील सोशल मीडिया हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करण्यासाठी अर्थातच इंटरनेट जोडणी, लॅपटॉप, कंप्युटर, अतिप्रगत मोबाईल फोन यांची गरज असते. इसवीसन २००० आणि २०१० या एका दशकात इंटरनेटचा वापर करणार्‍या भारतातील लोकांच्या संख्येत १४०० टक्के वाढ झाली आहे. मात्र इंटरनेट जो़डणी भारतात सर्वदूर पोचलेली नाही. भारतातील इंटरनेट जोडणीचा प्रसार ८ टक्के आहे तर चीनमध्ये ४० टक्के आहे. अर्थातच भारतातील बहुसंख्य जनता अजूनही सामाजिक प्रसारमाध्यमांच्या कक्षेत आलेली नाही. मात्र मोबाईल फोनचा सर्वदूर प्रसार झाल्याने दिडके संदेश (एसएमएस) मात्र भारतात सर्वदूर पोचतात. आणि दिडक्या संदेशांचा समावेश ट्विटरप्रमाणेच सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये वा नव्या प्रसारमाध्यमांमध्ये होतो. या प्रसारमाध्यमांचा कल्पकतेने उपयोग केल्याने अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीला देशव्यापी पाठिंबा मिळाला. कोणताही मूलगामी विचार, संघटना नसतानाही देशव्यापी आंदोलन वा जागृती घडून आली. . मध्यामची गरज त्यांची उपलब्धता आणि त्याची मर्यादा लक्षात घेऊन समाजात माध्यमांचा वापर करणे फायद्याचे ठरते खर पाहता सोशल मिडिया हे तंत्रज्ञान आणि वेब वर आधारित टूल आहे सामाजिक परस्पर संवाद जे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांचे अनुभव विचार मते एकमेकांपर्यंत पोहोचवते अनुभूती देते सोशल मिडिया वेब साईट या लोकांनी लोकांसाठी तयार केलेल्या आसतात. सोशल मिडिया म्हणजे नुसते सोशल नेट वर्किंग न्हवे तर त्या हि पेक्षा बरेच काही आहे लोकांना आपली मते व्यक्त करता येतील आणि माहितीची देवाण घेवाण करता येयील आश्या अनेक वेब साईट चे एकत्रीकरण म्हणजे सोशल मिडिया होय . पारंपरिक प्रसारमाध्यमे, राजकीय व्यवस्था यांच्यासमोर मुक्त माध्यमांनी नवे आव्हान उभे केले आहे. युरोप व अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आज मुक्त माध्यमांमुळे जाहिरातीच्या व्यवसायाला ग्रहण लागले म्हणून ओरड करीत आहेत तर इजिप्तमधील ताहीर चौकात झालेली क्रांती व मुक्त माध्यमांमुळे भारतात अण्णांच्या आंदोलनाला मिळालेले पाठबळ यामुळे राजकीय व्यवस्थांसमोर मोठे प्रश्न उभे राहीले आहेत. मुक्त माध्यमांना कसे हाताळायचे हा मोठा पेच सध्या अनेकांसमोर  आहे मात्र हि माध्यमे आज नवीन नवीन प्रगतीची दालने खुली करून देत आहेत हे मात्र तीतकच खरे आहे

ताकद वेब मिडिया ची



       वेब  मिडीयामध्ये मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस, इंटरनेट म्हणजे पैसा कमावण्याचे एक प्रमुख साधन ही इंटरनेटची नविन व्याख्या आपण लवकरात लवकर आत्मसात केली पाहिजे. इंटरनेटवर चहुबाजुला व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत, डोळसपणे त्यांच्याकडे पहायला सुरुवात केली पाहिजे. या वेब मिडिया बद्दल थोडीशी माहिती खालीलप्रमाणे
     युनायटेड स्टेट्स मध्ये दर आठवड्याच्या ऑनलाईन ट्रॅफीकचा अभ्यास केल्यावर असे लक्शात येते की गुगल वापरणार्‍यांपेक्षा फेसबुक वापरणार्‍या नेटीझन्सची संख्या जास्त आहे.
       पुर्वी इंटरनेटचा सर्वाधिक वापर सेक्सविषयक वेबसाईट्स (Porn) पाहण्यासाठी केला जात असे मात्र सोशल नेटवर्कींगने त्यावरही मात केली आहे.
        गेल्या वर्षी फेसबुक वापरणार्‍यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते हे त्या देशाचे नागरीक आहेत असे गृहीत धरले तर फेसबुक हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश झाला असता. म्हणजे फक्त भारत आणि चीन पेक्षा मागे आणि युनायटेड स्टेट्सच्याही पुढे.
        जगभरातील ८०% कंपन्या भरतीसाठी (Recruitment) सोशल मिडियाचा वापर करतात आणि त्यापैकी ९५% कंपन्या यासाठी linkedIn या सर्वात मोठ्या प्रोफेशनल सोशल नेटवर्कचा वापर करतात.
      हि सगळी  माहिती सांगण्याचे महत्वाचे कारण म्हणजे यावरून आपल्या लक्षात येयील कि सोशल मेडिया आता एक नवी शक्ती बनुन येत आहे ह्यात शंकाच नाही.मुंबईतील ह्याच सर्वोत्त्म उदाहरण म्हणजे २६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर कोणीही आयोजक नसताना नसताना ३ डिसेंबरला दहशतवादाचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑह ईंडियावर जमलेले लाखो भारतीय. ह्या एकत्र येण्याबद्द्ल सर्वप्रथम आवाहन करण्यात आलं फेसबुकवरुन आणि त्यानंतर ऑर्कुट ,ईमेल , एस. एम. एस. अश्या सगळ्या माध्यमातुन हे आवाहन पसरत गेलं.फेसबुकवरील एक मेसेज खुप काही करु शकतो हेच यातुन दिसुन येत.हीच

ताकद वेब मिडिया ची आपल्याला पाहायला मिळते. मात्र तरीही काही या वेब मिडिया च्या मर्यादा आहेतईंटरनेट हा शतकातील सर्वात मोठा शोध आहे यात कोणतीही शंका नाही. ईंटरनेट ने माहितीचा प्रचंड साठा आपल्यासमोर आणला.पुर्ण जग खर्‍या अर्थाने जवळ आणलं. परंतु खरच या शोधाचा फायदा पुर्ण जगाला, जगातील प्रत्येकाला घेता आलाय का ?दुर्दैवाने याचे उत्तर आजही नाहीच आहे. अजुनही ईंटरनेट जगातील असंख्य लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही.आतापर्यंत जगातील फक्त ३०% लोक ईंटरनेट वापरु शकले आहेत.याची कारणे बरीच आहेत. पण मुख्य कारणे आहेत ईंटरनेट्ची न परवडणारी किंमत आणि गावागावात, अनेक दुर्गम भागात ईंटरनेट जोडणी पोहोचवण्यात येणार्‍या अडचणी. यावरून वेब मिडिया ची उपलब्धता त्याची पोहोच आणि त्याच्या मर्यादा याची जाणीव आपल्याला समजते.