भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राई निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे.ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचा मुनी होऊन गेला. त्याने नाट्यकलेवर एक ३७ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणुन प्रसिद्ध आहे.अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, त्याने 'नाट्यवेद' म्हणुन पांचवा वेद निर्माण केला.यात, ऋग्वेदातील पाठ्य,यजुर्वेदातील अभिनय,सामवेदातीलगायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आलेत. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर,त्यांनी भरतमुनींना त्याचा पृथ्विवर प्रसार करण्यास सांगीतले.शिवाने भरतमुनीचे प्रथम नाट्य बघुन,आपला शिष्य तंडु यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धांत कथन करण्यास पाठविले.या सिद्धांतांचा समावेश त्याने ’तांडव लक्षण’ या सदरात केला आहे.भरत मुनींनी शरीराच्या १० मुद्रांचा, मानेच्या ९,हातांच्या ३६ तर डोक्याच्या १३ मुद्रांचा त्यात समावेश केला आहे. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी मग त्याचे या मुळ सिद्धांतांचा वापर करून व त्यास फुलवुन, त्यांची, कंठ व वाद्य संगीताशी एकतानता करुन, त्याचा एखाद्या कथेच्या/कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृतपणे वापर केला. भरत नाट्य ,कथकली
,कुचुपुडी व लावणी या सगळ्यात नाट्यशास्त्र
असते. काबुकी या मध्ये देखील नाट्यशास्त्र असते.
भरताचे हे नाट्य शास्त्र चार वेदांच्या थोड्या फार माहितीने बनले आहे आणि यासाठी विविध माहितीचा उपयोग केला गेला आहे यामध्ये २२ वा अध्याय हा सामान्य अभिनयाचा आहे आंगिक वाचिक सात्विक अभिनयाचे संतुलन म्हणजे सामान्य संतुलन होय भूमिकेशी समरस होणे म्हणजे सात्विक अभिनय होय जो यात अत्यंत महत्वाचा आहे
अभिनयाचे चार प्रमुख प्रकार सांगितले आहेत \
आंगिक
वाचिक
सात्विक
आहार्य
’अभिनय’’ च्या अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे
आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक्धार्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो
लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत
वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो
No comments:
Post a Comment