Thursday, 21 March 2013

नाद



 म्हणजे मुळातच कॉस्मिक ध्वनी किवा ब्रम्हाड तील कंपन होय आणि त्यामुळे याला विशेष महत्व आहे.मुद्दा हा की गणेशयुगातील ' नाद ' संकल्पनेतून बहरत गेलेले भारतीय रागसंगीत ही एक मने जोडणारी सुप्रणाली होती. नकारात्मकतेला छेद देणारी प्रणाली! तिच्यात वादी-संवादी स्वरांना एकत्र ठेवण्याची ताकद होती. सुरेलपणाची बांधिलकी होती. ताल-वादनाला सहोदर मानण्याची सत्प्रवृत्तीही होती. त्या प्रणालीत राग-तालोचित कर्मठ शिस्त होती. कल्पनाविलासाच्या असीम शक्यता फुलवणारी शिस्त. बेसुरीपणाची ,तालहीनतेची नकारात्मकता दूर ठेवणारी शिस्त! 
गणेशयुगाचे वैशिष्ट्य असे , की आचार्यांनी ही शिस्त वादी-संवादी स्वरांच्या एकात्मतेची शिस्त मानली. तिच्यातून ' परस्परविरोधी धारणांतील संतुलित ऐक्य ' हा नवा अभ्यास विषय तयार केला. आणि अभ्यासातून झाला एक सिद्धांत : ' परस्परविरोधी धारणांचे सुरेल संतुलित ऐक्य ऊर्जा निर्माण करते '. समाज-गण-गणतंत्राला' राष्ट्र ' बनवणारा हा सिद्धांत ' अर्ध-नारी नटेश्वर ' या शिवप्रतीकात समाविष्ट झाला. हाच सिद्धांत पुढे चीनमधून जगभर ' यिन-यँग थिअरी ' म्हणून पोचला.
 नाद म्हणजे मनातला आवाज होय मात्र हा आवाज ओळखण्यासाठी मनाला ओळखणे गरजेचे असते नाद म्हणजे थोडक्यात एखादा छद लागणे होय. नाद विविध ध्वनी च्या कंपनातुन तयार होत असतो आणि त्याचा ही एक सांकेतिक अर्थ ही असतो काहीवेळेला नाद याला resound म्हणजे पुनर ध्वनी होय ज्या मध्ये एखाद्या वस्तूला आवाज म्हणजे ध्वनी आपटून जेव्हा पुन्हा तो परत येतो तेव्हा तोच धव्नि ऐकु येतो त्याला resound म्हणतात\ नाद या व्याखेचे उत्तम उदाहरण म्हणजे वाद्य होय तबला सितार बेंजो पियानो व्यायालीन सारंगी बासरी हार्मोनियम अश्या विविध वाद्यातून जो आवाजाचा कंप निघतो त्याला नाद म्हणतात ,नादाचे दोन प्रमुख प्रकार पडतात 
आहत नाद 
 सहज नाद 
या दोन प्रकरतुन नाद म्हणजे काय त्याचा आवाका किती त्यातुन काय साध्य केले जाते ह्याची प्रचीती येते.
आहात नाद  म्हणजे जो आवाज कोणत्याही कारणांशिवाय वाद्यातून किंव्हा कोणत्या ही वस्तु तून निघतो त्याला आहत नाद म्हणतात .सहज नाद म्हणजे कोणत्या ही माध्यमांतून निघालेला आवाज किवा ध्वनी म्हणजे सहज नाद होय ,आणि हेच नाद चित्रपटात ही वापरले जातात आणि विशेष परिणाम साधला जातो.

No comments:

Post a Comment