Thursday, 21 March 2013

रस (सौंदर्यशास्त्र)


हे मनाची भावनीक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस हि नाट्यशास्त्र,नाटक,अभिनय,साहित्य आणि संगीत ह्या कलेच्या शाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे.मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, र्हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नउ प्रकारचे रस निर्माण होतात. १. शृंगार २. वीर ३. करुण ४. हास्य ५. रौद्र ६. भयानक ७. बीभत्स ८. अद्भुत ९. शांत जीवन हे विविध रसांनी भरलेले असे आहे आणि या रासंमुळेच आपल्या जीवनाला अर्थ आहे   . रस याचा शब्दशः अर्थ चव किंवा रूची असा आहे. व्यावहारिक जीवनात एकूण ज्ञात सहा रस आहेत: गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट खारट. एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो, तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव वा गोडी आपण अनुभवतो; यालाच रसास्वाद असा पूरक शब्द आहे.
. १. शृंगार २. वीर ३. करुण ४. हास्य ५. रौद्र ६. भयानक ७. बीभत्स ८. अद्भुत ९. शांत या रसांना आपल्या जीवनात खुप महत्व आहे शांत रस हा अत्यंत विनयशील आसा रस या सगळ्यांमध्ये आहे 
रस सिद्धांत : रस हाच काव्याचा आत्मा, म्हणजे मुख्य प्राणभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन करणारे जे मत, त्याला रससिद्धांतम्हणता येईल. रस म्हणजे एक विशिष्ट प्रकारची चित्तवृत्ती होय. हिचे स्वरूप आस्वादाचे, चर्वणेचे व तन्मूलक आल्हादानुभवाचे असते. हा अनुभव अर्थात काव्य (नाट्य) रसिकाचा अनुभव असतो. तो त्याच्या प्रचीतीला अणून देण्याचे सामर्थ्य काव्यात वा नाट्यात असते, म्हणून रस हा काव्यात अथवा नाट्यात असतो असे म्हणावयाचे. हे सामर्थ्य काव्याचे (म्हणजे नाट्याचेही) आत्मभूत तत्त्व आहे, ही कल्पना या रससिद्धांताचा मूळ पाया आहे. रसिकमनात आणि काव्यातही, ही रसनिष्पत्ती कशी होते, याविषयी भरताने प्रथम आपल्या नाट्यशास्त्रात एक सूत्र घालून दिले आणि त्या सूत्राला धरून आणि त्याच्या भोवतीच संस्कृत साहित्यशास्त्रामधील एतद्‌विषयक पुढील सर्व चर्चा झाली आहे. ते सूत्र असे : विभावअनुभावव्यभिचारिसंयोगात् रसनिष्पत्तिः’ (नाट्यशास्त्र ६२२). म्हणजे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते.\
स्थायी भावांचे अनुक्रमे शृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, अद्‌भूत, हास्य आणि वीभत्स असे आठ रस होतात. पण या स्थायी भावांना रसरूप येण्यास त्या त्या भावांना अनुरूप असे विभाव, अनुभाव आणि संचारी वा व्यभिचारी भाव हे अस्तित्त्वात यावे लागतात.
·         शृंगार (शृंग ~ कामवासना) : स्त्री-पुरूषांना एकमेकांना वाटणार्‍या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची उत्पत्ती होते
·         वीर : उत्साह हा रसाचा स्थायीभाव. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून हा रस निर्माण होतो.

·         करूण : शोक किंवा दुःख, वियोग, संकट यांतून हा रस निर्माण होतो. हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनांत हा रस आढळतो. 

·         हास्य : विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनांतून हा रस निर्माण होतो.

·         रौद्र : अतिशय क्रोध, राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो.

·         भयानक : भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, खून, सूड, भूत, स्मशान इत्यांदीच्या वर्णनांतून हा रस आढळतो. युद्धकथा, रहस्यकथा, भीतिकथा यांमधील वर्णनांतून हा रस बघावयास मिळतो.

·         बीभत्स : किळस, वीट, तिटकारा, अश्लिल वर्णन करणार्‍या कवितांतून, लेखांतून, चित्रपटांतून, गाण्यांतून किंवा वर्णनातून हा रस आढळतो. 

·         अद्‍भूत : विस्मय हा या रसाचा स्थायीभाव, परींच्या कथा, अरेबियन नाइट्स, अलिबाबा चाळीस चोर, जेम्स बॉण्डच्या साहसकथा इत्यादींच्या वर्णनातून हा रस आढळतो. 

No comments:

Post a Comment